Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या जाणून घ्या दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडी

जाणून घ्या दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडी


Maharashtra Political Crisis :   शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. आज दिवसभर राजकीय पटावर  भाजपची एन्ट्री झाली नाही. आज दिवसभरात अनेक गोष्टी घडल्या आहेत. दिवसभरात घडलेल्या दहा घडामोजी  जाणून घेऊया

1.  हे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांसोबतचा एक व्हिडीओ सकाळी जारी केला. या व्हिडीओमध्ये  गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात 49 आमदार होते. त्यापैकी 42 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते.

2.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. त्यापैकी काही आमदार हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, तर आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरून उपस्थित होते. तर संजय राऊतांनी शिंदेंच्या गटातील 21 आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली

3. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेचे बहुमत आहे. ते फक्त रुसून तिथे गेले आहे. त्यांचा रुसवा फुगवा निघाला की, ते पुन्हा सोबत येतील”, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

4. मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हमधून आमदारांना आवाहन केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप आमदार शिरसाट यांनी केलाय.  या आहेत आमदारांच्या भावना असं सांगत एकनाथ शिंदे यांनी हे पत्र ट्विट केलंय. 

5. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले.

6.  संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरु झालं.  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नाना पटोले यांची एच.के. पाटील यांच्यासोबत  काँग्रेसनं तातडीनं वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली.  तर नाना पटोलेंनी आम्ही महाविकासआघाडी  सोबत आहे, असे म्हणत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

7.  राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, अजित पवार उपस्थित होते. बैठकीत शरद पवारांनी आपण महाविकास आघाडी सोबत असून ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. तर संजय राऊत म्हणाले, का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत.. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! 

8. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. संजय राऊत यांच्या ‘ ..तर महाविकास आघाडीतून बाहेर’ पडण्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं वक्तव्य केलेलं असावं.

9. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शिंदेंनी भाजप पाठीशी असल्याचं स्पष्ट म्हंटलंय भाजप काहीही कमी पडू देणार नाही असं शिंदे आमदारांना सांगत आहेत.कुठेही कमी पडणार नाही,असे सांगितले.  
 
10. राज्य सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. त्यामळं शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. तसंच हे सरकार बहुमतात आहे की नाही  हे विधानसभेत स्पष्ट होईल, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. तर बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण  राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे.

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जणन #घय #दवसभरत #घडललय #रजकय #घडमड

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार?

मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला (Shiv Sena) झटका देण्यासाठी रणनीती...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई :  राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189  रुग्ण कोरोनामुक्त...

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

माऊलींची पालखी फलटणमधून तर तुकोबांची पालखी निमगाव केतकीतून उद्या प्रस्थान करणार

मुंबई, 1 जुलै : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी (Pandharpur Vithhal Rukmini) हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी...