Thursday, July 7, 2022
Home क्रीडा जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.गुरुवारी झालेल्या ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा ५-० असा धुव्वा उडवला. पाचही पंचांनी अनुक्रमे ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७, २९-२८ अशा गुणफरकाने निखतच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे एमसी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांच्यानंतर जगज्जेती म्हणून मिरवण्याचा मान तिने मिळवला.

निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने अंतिम लढतीत अपेक्षेनुसार आक्रमक खेळ केला. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत सुरुवातीपासून निखतने वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत तीन वेळा विश्वविजेत्या कझाकस्तानच्या झाइना शेकेर्बेकोव्हाचा पराभव करणाऱ्या जुतामासने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखतने भक्कम बचाव करत तिचे आक्रमण परतवून लावले. दुसऱ्या फेरीतही २५ वर्षीय निखतने आपल्या उंचीचा फायदा घेतला. तिने प्रतिस्पर्धी जुतामासपासून अंतर ठेवले. त्यामुळे जुतामासने प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात चुका करण्यास सुरुवात केली. निखतने याचा फायदा घेत या फेरीतही आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

तिसऱ्या फेरीत आघाडीवर असूनही निखतने अधिक आक्रमकता दाखवली. त्यामुळे जुतामासला बचावावर भर देणे भाग पडले. निखतने समोरच्या दिशेने अचूक मुक्के मारत जुतामासवर दडपण टाकले. तिच्या आक्रमणापुढे जुतामासचा निभाव लागला नाही. अखेरीस निखत आणि जुतामास या दोघींनाही आपणच हा जिंकलो असा विश्वास होता. मात्र, सर्व पंचांनी निकाल निखतच्या बाजूने दिल्याने तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

एकूण तीन पदके

निखतच्या आधी मनिषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी कांस्यपदके पटकावली होती. त्यामुळे ७३ देशांतील ३१० बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या यंदाच्या स्पर्धेत भारताला एकूण तीन पदके मिळाली. भारताच्या १२ पैकी आठ बॉक्सिंगपटूंना (तुर्कीसह संयुक्तरीत्या सर्वाधिक) उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. १० निखतने भारताला महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील १०वे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. यापैकी सहा सुवर्णपदके एमसी मेरी कोमने पटकावली आहेत. ३९ निखतच्या सुवर्णपदकामुळे भारताची महिला जागतिक स्पर्धेतील पदकसंख्या ३९ (१० सुवर्ण, ८ रौप्य, २१ कांस्य) झाली आहे. केवळ रशिया (६०) आणि चीन (५०) यांना भारतापेक्षा चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जगतक #बकसग #सपरध #नखतच #सनर #महर #World #Boxing #Championship #Nikhat #Golden #Bloom #Indian #boxer #Gold #medal #World #Boxing #Championships #ysh

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Kaali Poster : काली पोस्टर वादावर ट्वीटरने उचललं मोठं पाऊल

Leena Manimekalai Kaali Poster : सिने निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांचा 'काली' (Kaali) हा माहितीपट सध्या देशभरात...

रशिया-युक्रेनमधील लोकांची ज्योतिष्यांकडे धाव! “मार्च 2023 पर्यंत पुतिन…”

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. चार महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरु असून ते बंद होण्याची चिन्हे नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा...

PHOTO : पलक तिवारीच्या अदा; चाहते झाले फिदा!

PHOTO : पलक तिवारीच्या अदा; चाहते झाले फिदा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : Vi yearly prepaid plan: खासगी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या तुलनेत मागे पडली...

Airtel कडून 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच; महिनाभरात मिळणार तुफान फायदे

मुंबई : एअरटेल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक रोमांचक योजना ऑफर लॉंच करीत करते. एअरटेलने चार नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्ये दोन रेट-कटिंग प्लॅन्स...

Lonavala bhushi Dam Overflow : लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो ABP Majha

<p>सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी आता ओसंडून वाहू लागलंय. गेल्या दोन दिवसात लोणावळा परिसरात तुफान...