Monday, July 4, 2022
Home विश्व जागतिक तापमान वाढीचा भारताला मोठा धोका; IPCC च्या अहवालातून इशारा

जागतिक तापमान वाढीचा भारताला मोठा धोका; IPCC च्या अहवालातून इशारा


IPCC Report 2021 : पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल क्लायमेट चेंज 2021-दी फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात येणाऱ्या काळात पूर, उष्णलहरी, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भयंकर दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणार आहे. त्याचसोबत 21व्या शतकात उष्णतेचे प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. 

येणाऱ्या 10 ते 20 वर्षात जागतिक तापमानवाढीचा दर 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढण्याची चिन्ह आहेत. भविष्यातील तापमान वाढीमुळे नैसर्गिक जगाला हानी पोहोचू शकते. अशावेळी जमीन आणि समुद्र या परिसंस्था वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या पडतील असे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्याचसोबत कार्बन डायऑक्साइडशिवाय इतरही हरितगृह वायूंवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. विशेषत: मिथेन या प्रभावी हरितगृह वायूचे संकट गंभीर आहे. तापमानवाढ रोखायची असल्यास नेट झिरो प्लॅन्सची अंमलबजावणी धोरणकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. कार्बन डायऑक्साइड नष्ट करणं हे अतिशय कठिण नेट झिरो टूल आहे; मात्र उत्सर्जनाचे प्रमाण कमी केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र सध्याची परिस्थिती बघता धोरणकर्त्यांकडून याबाबतचे प्रयत्न कमी होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान 1.5 ते 2 डिग्रीपर्यंत थांबेल अशी कोणतीच चिन्ह नाहीत. धोरणकर्त्यांकडून आणि सरकारी पातळींवर बघायचं झालं तर ही तापमानवाढ 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत देखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

भारत, चीन आणि इतर आशियाई देशात उष्णलहरी अधिक वाढल्या आहेत आणि थंडीचे प्रमाण, यातील एक्स्ट्रीम इव्हेंट कमी झाले असल्याचं देखील अहवाल बोललं गेलं आहे. म्हणजेच स्पष्टपणे बोलायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंगचे हे स्पष्ट संकेत आहेत. 

जागतिक हवामान बदलास मनुष्यही कारणीभूत असून त्याच्या हस्तक्षेपामुळे 1970 पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्यागोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली आहे. 

या अहवालात ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उपाययोजना देखील सांगितल्या आहेत. ज्यात स्पेसमध्येजमा होणारे कार्बन कमीकरण्यावर भर दिला पाहिजे. सोबतच नेट झिरो आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेस कमी केले पाहिजेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमीतकमी कार्बन उत्सर्जनमध्ये देखील जागतिक तापमानवाढ होणारच आहे. अशात ह्या तापमानवाढीसोबतच जगण्यासाठीच्या उपाययोजनादेखील करायला हव्यात. 

नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो, स्कॉटलॅंडमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये जागातील बलाढ्य नेते एकत्रित येत हवामान बदलामुळे होणारे परिणाम कमी कसे करता येईल, सोबतच ग्रीनहाऊस गॅसेस कमी करण्यावर भर देणार आहेत, त्यामुळे त्याआधी प्रकाशित झालेल्या या अहवालाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जगतक #तपमन #वढच #भरतल #मठ #धक #IPCC #चय #अहवलतन #इशर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

विम्बल्डन टेनिस स्पर्धा :  श्वीऑनटेक, गॉफ पराभूत; हालेप, फ्रिट्झची आगेकूच

लंडन: फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती इगा श्वीऑनटेक आणि उपविजेती कोको गॉफचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. पुरुषांच्या...

Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी

मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज पार पडली.  शिरगणती...

Actor Santosh Juvekar Facebook Page Hacked And Shares Adults Picture By hacker nrp 97 | “माझ्या फेसबुकवर फारच अश्लील फोटो…”, संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट...

मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार...

अध्यक्षीय निवडीच्या दिवशी सभागृहात गैरहजर… आमदार जितेश अंतापूरकर बोहल्यावर

नांदेड: राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना, एकेक आमदाराचे मत बहुमोल असताना नांदेडमधील देगलूरचे आमदार मात्र बोहल्यावर चढले...

प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझ्या खाण्यापिण्यावरही बंदी…

अभिनेत्रीने तिच्या पतीवर आणि तिच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...