Saturday, July 2, 2022
Home भारत जागतिक तापमानवाढीचा भारताला मोठा धोका, 'या' दुष्परिणामांची शक्यता, IPCCच्या अहवालात इशारा ABP...

जागतिक तापमानवाढीचा भारताला मोठा धोका, ‘या’ दुष्परिणामांची शक्यता, IPCCच्या अहवालात इशारा ABP Majha


IPCC Report 2021 : पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल क्लायमेट चेंज 2021-दी फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात येणाऱ्या काळात पूर, उष्णलहरी, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भयंकर दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणार आहे. त्याचसोबत 21व्या शतकात उष्णतेचे प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. 

येणाऱ्या 10 ते 20 वर्षात जागतिक तापमानवाढीचा दर 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढण्याची चिन्ह आहेत. भविष्यातील तापमान वाढीमुळे नैसर्गिक जगाला हानी पोहोचू शकते. अशावेळी जमीन आणि समुद्र या परिसंस्था वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या पडतील असे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्याचसोबत कार्बन डायऑक्साइडशिवाय इतरही हरितगृह वायूंवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. विशेषत: मिथेन या प्रभावी हरितगृह वायूचे संकट गंभीर आहे. तापमानवाढ रोखायची असल्यास नेट झिरो प्लॅन्सची अंमलबजावणी धोरणकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. कार्बन डायऑक्साइड नष्ट करणं हे अतिशय कठिण नेट झिरो टूल आहे; मात्र उत्सर्जनाचे प्रमाण कमी केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र सध्याची परिस्थिती बघता धोरणकर्त्यांकडून याबाबतचे प्रयत्न कमी होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान 1.5 ते 2 डिग्रीपर्यंत थांबेल अशी कोणतीच चिन्ह नाहीत. धोरणकर्त्यांकडून आणि सरकारी पातळींवर बघायचं झालं तर ही तापमानवाढ 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत देखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

भारत, चीन आणि इतर आशियाई देशात उष्णलहरी अधिक वाढल्या आहेत आणि थंडीचे प्रमाण, यातील एक्स्ट्रीम इव्हेंट कमी झाले असल्याचं देखील अहवाल बोललं गेलं आहे. म्हणजेच स्पष्टपणे बोलायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंगचे हे स्पष्ट संकेत आहेत. 

जागतिक हवामान बदलास मनुष्यही कारणीभूत असून त्याच्या हस्तक्षेपामुळे 1970 पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्यागोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली आहे. 

या अहवालात ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उपाययोजना देखील सांगितल्या आहेत. ज्यात स्पेसमध्येजमा होणारे कार्बन कमीकरण्यावर भर दिला पाहिजे. सोबतच नेट झिरो आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेस कमी केले पाहिजेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमीतकमी कार्बन उत्सर्जनमध्ये देखील जागतिक तापमानवाढ होणारच आहे. अशात ह्या तापमानवाढीसोबतच जगण्यासाठीच्या उपाययोजनादेखील करायला हव्यात. 

नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो, स्कॉटलॅंडमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये जागातील बलाढ्य नेते एकत्रित येत हवामान बदलामुळे होणारे परिणाम कमी कसे करता येईल, सोबतच ग्रीनहाऊस गॅसेस कमी करण्यावर भर देणार आहेत, त्यामुळे त्याआधी प्रकाशित झालेल्या या अहवालाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जगतक #तपमनवढच #भरतल #मठ #धक #य #दषपरणमच #शकयत #IPCCचय #अहवलत #इशर #ABP #Majha

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्… क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड...

वन नाईट स्टँड ते गर्भपात, ‘ओपन बुक’मधून अभिनेत्री कुब्रा सैतने उलगडली आयुष्यातील अनेक गुपितं!

Kubbra Sait : लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची अर्थात ‘कुक्कू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैत...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

‘उद्धव ठाकरे आमचे नेते; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही’ : दीपक केसरकर 

Deepak Kesarkar PC : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही...

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ

नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी...