Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून...

जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या…


World IVF Day:  वर्ल्ड आयव्हीएफ दिन हा 25 जुलै रोजी साजरा केला जातो. 25 जुलै 1978 रोजी जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊनचा जन्म झाला होता. त्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. आज आयव्हीएफ दिनानिमित्त आयव्हीएफ म्हणजे काय आहे, ही प्रक्रिया कशी असते, किती सुरक्षित आहे तसेच यासंबंधी वेगवेगळ्या प्रश्नांवर या क्षेत्रातील तज्ञ असलेले यशोदा फर्टिलिटी अॅंड आयव्हीएफ सेंटरचे प्रमुख डॉ. बाळासाहेब खडबडे यांच्याशी एबीपी माझा डिजिटलनं खास संवाद साधला.

आयव्हीएफची ट्रिटमेंट ही बऱ्यापैकी सुरक्षित असते. आयव्हीएफ सायकलमध्ये 45 ते 50 टक्के सक्सेस रेट आहे. ज्या जोडप्यांना नॉर्मल ट्रीटमेंटनं अपत्यप्राप्ती होत नाही अशा जोडप्यांनी लग्नानंतर पाच ते दहा वर्षांनी आयव्हीएफ ट्रीटमेंट घेऊ शकतात. 10 ते 15 टक्के मुल न होण्याचा म्हणजे वंधत्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात यातील 3 ते 4 टक्के जोडपी आयव्हीएफच्या मदतीनं अपत्यप्राप्ती करत असल्याचं  डॉ. खडबडे यांनी सांगितलं. 

का येतात अडचणी, उपाय काय?

त्यांनी सांगितलं की, ज्या महिलेच्या फॅलोपियान ट्युब्स ब्लॉक असतील, हार्मोन्सची समस्या असेल, पीसीओडी अर्थात अंडाशय, गर्भाशयाच्या संबंधित आजार असेल, विषाणूंचे संक्रमण झाल्यास त्यांच्यात गर्भधारणा होत नाही. अशा महिलांसाठी आयव्हीएफ तथा आयसीएसआय तंत्रज्ञान उपयुक्त आहे, असंही खडबडे म्हणाले. वंधत्वाची समस्या टाळण्यासाठी योग्य वेळी लग्न करा. चांगला आहार घ्या. रोज व्यायाम करा. योगाला स्वीकारा, असं देखील ते म्हणाले. जरी नैसर्गिक पद्धतीनं अपत्यप्राप्तीसाठी अडचणी येत असतील तरी आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमाने आपलं स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकतो, असंही ते म्हणाले.  

सध्याची आयव्हीएफ ट्रीटमेंट प्रगत

सध्याची आयव्हीएफ ट्रीटमेंट प्रगत झाली आहे. यामध्ये एक सी प्रोसीजर केली जाते. यात साय़टोप्लॉझममध्ये स्पर्म इंजेक्ट केलं जातं. तयार झालेले गर्भ लेब्रोटरीजमध्ये वाढवले जातात. पाच दिवस वाढ झालेले गर्भ आहेत त्याला ब्लास्टोसिस्ट स्टेज म्हणतो. यानंतर ते गर्भाशयात सोडले जातात. यात जास्तीत जास्त सक्सेस रेट आहे. तसेच पीजीपी तंत्रज्ञानानं जेनेटिक्स तपासण्या केल्या जातात. त्याचं निदान करुन त्यावर योग्य ती ट्रिटमेंट केली जाते, असं डॉ खडबडे यांनी सांगितलं.  

खर्च किती
आयव्हीएफच्या ट्रिटमेंटसाठी साधारण एक लाख ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो, असं डॉ. बाळासाहेब खडबडे यांनी सांगितलं. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जगतक #आयवहएफ #दन #अपतय #न #हणऱय #जडपयसठ #वरदन #कय #आह #IVF #तजञकडन #जणन #घय

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Online Fraud: 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

मुंबई: आजच्या हायटेक काळात इंटरनेटच्या वारपरामुळे कामं सोप्पी झाली आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन व्यवहार (online transactions) आल्यानंतर हॅकर्स देखील सक्रिय झाले असून Online...

pankaja munde talk about mla from the other party in bus bai bus zee marathi programme nrp 97 | “माझ्या वडिलांनी मला…” आमदार फोडाफोडीच्या...

झी मराठीच्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...