घटनेनंतर तत्काळा बचावकार्याला सुरूवात करण्यात आलीय. एनडीआरएफची बचाव टीम धरणाजवळ पोहचल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास १०.२० वाजता भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर २५४ आर्मी AVN स्क्वॉड्रननं मामून कँटमधून उड्डाण घेतलं होतं. धरणाजवळच्या भागात हे हेलिकॉप्टर अगदी थोड्या उंचीवर पाहणी करत होतं. मात्र, अचानक हेलिकॉप्टर धरणात कोसळलं. हा अपघात नेमका कसा घडला, हे चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकेल. कठुआ जिल्ह्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायव्हर्सद्वारे सरोवरात सर्च ऑपरेशन राबवण्यात येतंय.
यंदाच्या वर्षातला दुसरा लष्करी हेलिकॉप्टर अपघात
उल्लेखनीय म्हणजे, याच वर्षाच्या सुरवातीलाच जम्मूमध्ये भारतीय सेनेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट उपस्थित होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#जममकशमर #कठआमधय #लषकरचय #हलकपटरल #अपघत #धरणत #कसळल