Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष  पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर : सुरेश वाडकर

जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष  पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर : सुरेश वाडकर
नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत  सापडलेल्या सुरेश वाडकर यांना नाशिक पोलिसांनी दिलासा दिला आहे. जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष  पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर झाला. दरम्यानच्या काळात सरकारी अधिकारी, मोठमोठे राजकीय नेते कोणीच मदत केली नाही, अधिकारी तर केवळ वेळकाढू पण करत असल्याची खंत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

भूमाफिया विरोधात नाशिक पोलिसांनी मोहिम उघडली असून जनजागृती भूमाफिया या लघुपटाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्यां उपस्थितीत पार पडला. यावेळी भूमाफियाचा मी स्वतः शिकार झालो होतो. लॅटिकेशनची जमीन मला विकण्यात आली. माझ्या एका मित्रानेच मला फसवले, वादग्रस्त जमिन खरेदी केल्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची किंमत मोजावी लागली, असे वाडकर म्हणाले.

वाडकर म्हणाले, राष्ट्पती भवनातून चौकशी झाली. गुन्हा दाखल असल्यानं तब्बल 11 वर्ष पद्मश्री पुरस्काराला मुकावे लागले. याकाळात आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी देखील दिलासा दिला नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे यांच्यासह मोठमोठ्या नेत्याकडे गेलो मात्र कोणी दिलासा दिला नाही. अधिकाऱ्यांनी तर फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप वाडकर यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला. नाशिकमध्ये संगीत  शाळा सुरू करणार असल्याचे देखील वाडकर या वेळी म्हणाले.

ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, मेघा रे मेघा रे, चप्पा चप्पा चरखा चले यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. 1981 मध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या क्रोधी चित्रपटात चल चमेली बाग में, तर प्यासा सावन चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासह मेघा रे मेघा रे ही गाणी त्यांनी गायली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जमनचय #वदत #अडकलयन #वरष #पदमशर #परसकर #मळयल #उशर #सरश #वडकर

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, घरीच प्रिंट करू शकता स्वतःचे फोटो; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला कागदपत्रं प्रिंट करावी लागतात. अगदी कॉलेजची मार्कशीट असो अथवा छोट्या नोट्स बनवायच्या असतील, आपण दुकानात जाऊन प्रिंट काढतो....

‘रुपी’वरील हातोडा टाळता आला असता?

१९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेला सहकार क्षेत्रातील अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांची बळी ठरल्याने ही घरघर लागली आहे. सचिन रोहेकर मराठी माणसांनी सुरू...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...