Friday, August 12, 2022
Home भारत जमिनीच्या वादातून तुफान गोळीबार, दिवसाढवळ्या 5 जणांचा खून, गावात स्मशानशांतता

जमिनीच्या वादातून तुफान गोळीबार, दिवसाढवळ्या 5 जणांचा खून, गावात स्मशानशांतता


नालंदा, 4 ऑगस्ट : ग जमिनीच्या बांधावरून दोन गटामध्ये किरकोळ भांडणं सुरू होती. मात्र शब्दाला शब्द वाढत जाऊन दोन्ही गट आक्रमक झाले आणि दोन्हीकडून जोरदार गोळीबार (firing) करण्यात आला. यात 5 ग्रामस्थ ठार (5 dead) झाले असून दोनजण गंभीर जखमी (2 injured) झाले आहेत.

अशी घडली घटना

बिहारमधील नालंदाजवळ असणाऱ्या लोदीपूर गावात बुधवारी दोन गटात वाद झाले. जमिनीच्या मालकीवरून हा वाद सुरु झाला आणि या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात येऊ लागले. हळूहळू शिव्या सुरु झाल्या आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. दोन्ही गटातील लोकांनी बंदुका बाहेर काढल्या आणि एकमेकांवर फायरिंग सुरु केलं. एकूण सात जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मृतांची नावं गुपित

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. गावात सध्या तणावाचं वातावरण असून पोलिसांनी मृतांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. काही ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गावात सध्या भयाण शांतता असून प्रत्येकजण घाबरलेला आहे. गावात पोलीस तैनात करण्यात आले असून परिस्थिती चिघळू नये, याची काळजी घेतली जात आहे.

हे वाचा -छोट्या व्यापाऱ्यानं केलं मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण

नालंद्यात एका आठवड्यात 7 खून

नालंदा परिसरात गेल्या आठवड्याभरात एकूण 7 जणांचा खून झाला आहे. या घटनेतील 5 जणांव्यतिरिक्त डुक्कर चोरीच्या वादातून एकाचा खून झाला होता. आणखी एका तरुणाला वैयक्तिक वादातून छातीत गोळ्या घालून संपवण्यात आलं होतं. बिहारमधील गुन्हेगारी वाढत चालल्याचं हे लक्षण असून ग्रामस्थ सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जमनचय #वदतन #तफन #गळबर #दवसढवळय #जणच #खन #गवत #समशनशतत

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...