Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल जगातील बेस्ट पार्टनर बनायचं आहे? मग सकाळी उठल्या उठल्या न चुकता फॉलो...

जगातील बेस्ट पार्टनर बनायचं आहे? मग सकाळी उठल्या उठल्या न चुकता फॉलो करा ‘या’ 5 गोष्टी..!


नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जे कपल्स एकमेकांना समजून घेतात आणि आपल्या पार्टनरच्या सवयीनुसार स्वत:मध्ये बदल घडवतात त्यांचे नाते आनंदी असते आणि जास्त काळ टिकते. पण ही गोष्ट देखील खरी आहे की ही किमया फार कमी कपल्सना साधता येते. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, समस्या यामुळे अनेकदा मतभेत निर्माण होतात. अपेक्षा भंग होऊ लागतात, अशावेळी दोन्ही नवरा बायकोला एकमेकांशी जुळवून घेणे कठीण होऊन बसते.

यामुळे मोठ्या प्रमाणावर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कधी कधी नाते तुटते सुद्धा! हे होऊ द्यायचे नसेल तर काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे नाते कधीच तुटणार नाही उलट घट्ट होईल.

गुड मोर्निंग बोलणे

सकाळी उठल्या उठल्या आपल्या बाजूला असलेल्या आपल्या पार्टनरला गुड मॉर्निंग विश करणे खरंच खूप चांगली सवय आहे. जर तुम्ही असे करत असाल तर यातून एक चांगले बॉन्डींग निर्माण होते. तुमचा दिवस तुमच्या जोडीदारापासून सुरु होतो. जोडीदाराला तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे हे यातून दिसून येते. त्यामुळे भले रात्री कितीही भांडण झाले असले तरी तुमची एक गुड मॉर्निंग म्हणण्याची सवय सगळं सुरळीत करू शकते.

(वाचा :- माझी कहाणी : लाखो मुलगे मागे असतानाही मी 40 वर्षांच्या बॉससोबत लग्न केलं, मला माझा निर्णय योग्य वाटतोय कारण..!)

एकत्र वर्कआउट करणे

एकत्र वर्कआउट करणे हा एकत्र वेळ घालवण्याचा एक मस्त मार्ग आहे. यामुळे फिटनेस सुद्धा टिकते आणि एकमेकांसोबत एक सुंदर वेळ घालवता येतो. एकत्र व्यायाम केल्याने एक वेगळे बॉन्डींग निर्माण होते. हेच कारण आहे की नेक जाणकार सुद्धा एकत्र वर्कआउट करण्याचा सल्ला देतात आणि यामुळे नात्यामध्ये एक सकारात्मक परिणाम दिसतो हे सुद्धा अनेक निरीक्षणांमधून पुढे आले आहे. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून ही सवय स्वत:ला लावून घ्या.

(वाचा :- स्वत:च्याच घरात भेदभाव भोगावा लागल्यानंतर विद्या बालन प्रचंड संतापली, नेमकं काय झालं होतं? व्हिडिओ आला समोर..!)

एकत्र नाश्ता करा

ही अशी गोष्ट आहे जी दिसायला खूप साधी दिसते पण खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची असून यामुळे नात्यावर मोठा इफेक्ट होऊ शकतो आणि हा इफेक्ट नाते अधिक घट्ट करणारा ठरतो. एकत्र नाश्ता करत बोलल्याने अनेक चांगल्या गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करतो. सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर यामुळे संवाद दृढ होतो. एकमेकांशी असलेले कम्युनिकेशन वाढते. त्यामुळे ही साधी सोप्पी सवय वाटत असली तरी आवर्जून लावून घ्या. यामुळे तुम्हाला नात्यात मोठा फायदा होईल.

(वाचा :- नव-याने पोटावर बुक्की मारली कारण पोटातलं बाळ मरावं, मग फातिमाने घटस्फोट घेतला आणि कमावले तब्बल 30 लाख रूपये..!)

आपल्या पार्टनरला फील करा

अनेकदा लग्न झाल्यावर जे प्रेम असतं ते लग्नाच्या काही वर्षांनी हरवू लागतं. जर तसं होऊ द्यायचे नसेल तर आपल्या पार्टनरला फील करायला शिका. आता फील करायचे म्हणजे नेमके काय करायचे तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या जोडीदाराला तुमचे त्याच्यावर असलेले प्रेम दाखवून द्या. छोटया छोट्या गोष्टीतून त्याला दाखवला की तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे. याचा फायदा असा होईल की कितीही प्रॉब्लेम झाला तरी गोष्टी बिघडणार नाही.

(वाचा :- Gujarat sologamy marriage : अबब! नवरी, मंडप व सप्तपदी सर्व असेल पण ‘नवराच’ नसणार, 24 वर्षांची क्षमा बिंदू करणार स्वत:शीच लग्न आणि हनिमूनसाठी जाणार गोव्याला, कारण…!)

आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवावेत

आपल्या आर्थिक बाबी कधीच आपल्या जोडीदारापासून लपवू नयेत. असे केल्याने दोघांमधलील गैरसमज वाढत जाऊ शकतात आणि यातून भांडण व वाद-विवाद जन्माला येऊ शकतात. जर तुमच्या जोडीदाराला तुमची उधळपट्टी आवडत नसेल तर तिच्याशी बोलून या गोष्टी ताबडतोब सोडव्यात. तुमचे आर्थिक नियोजन कसे आहेत ते समजावून द्यावे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सेव्हिंग कधीच तिच्यापासून लपवू नये. संसारात अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा परिणाम पाडू शकतात. त्यामुळे दिवसभराच्या खर्चाचा लेखाजोखा सकाळीच मांडावा जेणेकरून दिवसभरातील आर्थिक गणिताची घडी व्यवस्थित घालता येऊ शकते.

(वाचा :- Sudha Murthy Relationship Tips: सुधा मूर्तींनी सांगितली सुखी आयुष्याची ५ रहस्य, आताच जाणून घ्या)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#जगतल #बसट #परटनर #बनयच #आह #मग #सकळ #उठलय #उठलय #न #चकत #फल #कर #य #गषट

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर आणि न्यासा देवगण दिसले एकत्र लन्च करताना; फोटो व्हायरल

 बॉलीवूड स्टार्स अनेकदा एकमेकांशी चांगले बाँन्ड शेअर करतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Samantha Ruth Prabhu : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर समंथाने सांगितलं लग्न तुटण्याचं कारण, म्हणाली..

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा 7वा सीझन (Koffee With Karan 7) प्रेक्षकांच्या भेटीला...

IAS अतहर आमिरच्या नव्या आयुष्याला सुरुवात, ‘या’ तरूणीसोबत झाली एंगेजमेंट!

मुंबई : आयएएस टीना दाबी आणि आयएएस अतहर आमिर खान यांनी काहीच दिवसांपुर्वी घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटानंतर टीना दाबी यांनी आयएएस प्रदीप...

स्वत:ला कर्णधार मानत विराट कोहलीने केली चूक; भारताला बसला मोठा फटका, पाहा आता काय केलं

कोहलीकडे भारताचे नेतृत्व नाही आणि पण तरीही तो आपल्याला भारताचा कर्णधार समजत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वत:ला कर्णधार समजत असताना कोहलीने यावेळी मोठी...