Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत


मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक किती वेळा मोबाईल वापरतात याबाबत एक धक्कादायक संशोधन अहवाल समोर आला आहे. अॅप अॅनीच्या (App Annie) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्टेट ऑफ मोबाइल अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 2021 मध्ये जागतिक स्तरावर यूजर्सनी मोबाईलवर विक्रमी 38 लाख कोटी तास घालवले आहेत. याचा अर्थ असा की लोकांनी फक्त 365 दिवसांत 43,35,02,300 वर्षे मोबाईलवर घालवली.

अहवालानुसार, लोक दररोज सरासरी 4.8 तास मोबाईल फोनवर घालवत आहेत. हा कालावधी त्यांच्या जागण्याच्या तासांच्या एक तृतीयांश इतका असतो. 2021 पर्यंत यूकेमध्ये दररोज फोनवर घालवलेला सरासरी वेळ चार तासांचा होता, जो वर्षाच्या जागतिक सरासरी 4.8 तासांपेक्षा कमी आहे. परंतु तेथे मोबाइलचा वापर 2019 मध्ये दिवसाच्या तीन तासांवरून 2020 मध्ये दिवसाच्या 3.7 तासांपर्यंत वाढला आहे.

मोठ्या पडद्याचा वापर संपुष्टात येतोय

अॅप अॅनीच्या अहवालात असे म्हटले आहे की 2021 हे ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ ठरले कारण यूजर्स मोबाइल जीवनशैलीचा अवलंब करत आहेत आणि मोठ्या स्क्रीनपासून स्वतःला दूर करत आहेत. अॅप अॅनीचे सीईओ थिओडोर क्रांत्झ म्हणाले की मोठ्या स्क्रीनचा वापर हळूहळू संपत आहे. वेळ घालवणे, डाउनलोड करणे आणि कमाई करणे यासह मोबाईल जवळजवळ प्रत्येक श्रेणीत रेकॉर्ड मोडत आहे.

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

डेटिंग अॅप्सवर 4.2 अब्ज डॉलर खर्च

अॅपचा वापर झपाट्याने वाढत आहे. अॅप अॅनीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी जगभरातील मोबाइल यूजर्सनी केवळ अॅपवर 170 अब्ज डॉलर खर्च केले. हे 2020 च्या तुलनेत 19 टक्के अधिक आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षी लोकांनी डेटिंग अॅप्सवर 4.2 बिलियन डॉलर पेक्षा जास्त खर्च केला. 2020 च्या तुलनेत हा आकडा 55 टक्क्यांनी अधिक आहे.

या देशांमध्ये लोक सर्वाधिक वेळ घालवतात

अहवालानुसार, ब्राझील, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियाच्या लोकांनी गेल्या वर्षी एका दिवसात सर्वाधिक 5 तास मोबाईलवर घालवले. यानंतर मेक्सिको, भारत आणि जपानचा क्रमांक लागतो. अमेरिकन लोक दररोज 4.1 तास मोबाईलवर घालवतात, जे टीव्ही पाहण्याच्या वेळेपेक्षा (3.1 तास) जास्त आहे.

WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट

10 पैकी 7 मिनिटे Facebook, Tiktok, YouTube वर

जगभरातील मोबाइल यूजर्स फेसबुक, टिकटॉक आणि यूट्यूबवर फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वात जास्त वेळ घालवतात. या अॅप्सवर प्रत्येक 10 मिनिटांपैकी 7 मिनिटे खर्च करतात. यामध्येही टिकटॉक आघाडीवर होता. चीन वगळता जगभरातील इतर देशांमध्ये टिकटॉकवर वेळ घालवण्याचे प्रमाण 90 टक्क्यांनी वाढले आहे.

भारत चौथ्या क्रमांकावर

भारतीय लोक सोशल मीडियावर दिवसाचे सरासरी 2.25 तास घालवतात, जे जागतिक सरासरी प्रतिदिन 2.5 तासांपेक्षा किंचित कमी आहे. भारतातील सोशल मीडिया यूजर्सची संख्या 2021 मध्ये सातत्याने वाढून 448 दशलक्ष झाली आहे, मुख्यत्वे संपूर्ण भारतभर स्मार्टफोनच्या व्यापक वापरामुळे, तर इंटरनेट यूजर्सची संख्या सुमारे 624 दशलक्ष झाली आहे, जी भारतातील एकूण लोकसंख्येच्या 45 टक्के आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जगभरत #लकन #दवसत #मबईलवर #घलवल #कट #वरष #भरतय #दखल #मग #नहत

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

स्कीनसाठी गुलाब जल वापरलं असेल; केसांसाठीही त्याचा असा घरच्या-घरी करा उपयोग

मुंबई, 26 मे : उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं तसं सोपं काम नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम हवेमुळे केस कोरडे, निस्तेज आणि खराब होतात....

VIDEO : शिखर धवनला वडिलांनी बदडले, पंजाब Playoff मध्ये न गेल्यानं काढला राग!

मुंबई, 26 मे : पंजाब किंग्जला (Punjab Kings) या आयपीएल स्पर्धेची 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पंजाबच्या टीमनं काही चमकदार विजय मिळवत शेवटच्या...

मेरा नाम हमेशा बिकता है! फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री केल्यानंतर हार्दिक पंड्याचं वक्तव्य

मुंबई : हार्दिक पांड्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया, वाद-विवाद यांचा सामना केला आहे. या सर्व गोष्टी मागे टाकून त्याने इंडियन प्रीमियर...

रक्त आणि throat swab मध्ये सापडला Monkeypox virus, उपचारांवर लॅन्सेटचा रिसर्च

इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Jio data plans: जिओकडे आहे अवघ्या १५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, हाय-स्पीड डेटाचा मिळेल फायदा

नवी दिल्ली :Reliance Jio Data Add on Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लान्स...