Friday, August 12, 2022
Home विश्व जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…


जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण ही लोकांची सर्वात मोठी चूक आहे. जंगलाच्या मधोमध बनवलेल्या रस्त्यावर अचानक गाडीतून खाली उतरल्याने एका महिलेला या मोठ्या चुकीचा फटका सहन करावा लागला. अचानक तिचं काय झालं (tiger drag woman in jungle viral video) हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

ट्विटर अकाउंट @RANDOMFACTS2022 वर अनेकदा आश्चर्यकारक पोस्ट टाकल्या जातात. नुकताच या अकाऊंटवर आणखी एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडीओ (tiger attack video) मधील विचित्र गोष्ट अशी आहे की त्यात अचानक एक वाघ येतो आणि महिलेसोबत असे काही करतो (woman came out of car tiger drag her video) ज्याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कार अचानक रस्त्यावर थांबते आणि एक महिला गोंधळलेल्या अवस्थेत त्यातून बाहेर पडते आणि मागे वळून कारच्या दुसऱ्या बाजूला येते. ती बहुधा ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीशी बोलत असावी. या वाहनाच्या मागे आणखी 2 कार थांबलेल्या दिसतात, जे कदाचित ही कार दूर जाण्याची वाट पाहत आहेत. तेवढ्यात एक मोठा वाघ येतो जो त्या महिलेचे पाय त्याच्या पुढच्या दोन पायांनी पकडून तिला झुडपांप्रमाणे ओढतो. वाघासोबत महिलेला ज्या प्रकारे ओढले जाते ते भयावह दृश्य आहे. कारमध्ये बसलेले लोक तिला वाचवण्यासाठी धावतात आणि इथे हा व्हिडिओ संपला आहे.

हेही वाचा – स्वप्नात पाहिलेल्या नंबरचं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि निवृत्त अधिकारी झाला करोडपती
व्हिडिओ कुठला आहे –

या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ जंगलाचा नसून वन्यजीव सफारीचा असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. ती आपल्या पतीशी वाद घालत असल्याने ती गाडीतून उतरली. याचवेळी या महिलेला वाघाने खेचले.

तपासात एबीसी न्यूज या परदेशी वेबसाइटचा 2016 चा अहवाल सापडला. यात ही घटना कव्हर करण्यात आली होती. वेबसाइटनुसार, हा व्हिडिओ 2016 मध्ये चीनमधील बीजिंग येथील एका राष्ट्रीय उद्यानातील आहे. ज्या महिलेवर हल्ला झाला ती 30 वर्षांची होती आणि ती या हल्ल्यातून वाचली होती. पण तिची आई, जी 57 वर्षांची होती, तिचा मृत्यू झाला, असे अहवालात दिसून आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#जगलचय #रसतयवर #गडतन #उतरल #महल #दसऱयच #कषण #वघन #जबडयत #पकडन

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

बिहारमधील सत्तांतराचा NDA ला फटका? आज निवडणूक झाल्यास मिळणार इतक्या जागा

मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला...

हिपॅटायटिसने प्रत्येक 30 सेकंदाला होतो 1 मृत्यू, WHO च्या टिप्स

हिपॅटाइटिस (Hepatitis Virus) हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरात जाऊन लिव्हरला सूज येण्यामागचे प्रमुख कारण ठरतो. लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

सर्वांना वाटतं आम्ही जीव द्यावा…; प्रेमी युगुलांची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहली आठ जणांची नावं

Rajasthan News: सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर जुट्टो या आठ जणांमुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबीयांना...

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...