Monday, July 4, 2022
Home करमणूक छोट्या पदद्यावर जुन्या मालिकांच्या नव्या पर्वाचं वारं; पण निर्मात्यांना वाटतेय 'ही'...

छोट्या पदद्यावर जुन्या मालिकांच्या नव्या पर्वाचं वारं; पण निर्मात्यांना वाटतेय ‘ही’ भीती


हायलाइट्स:

  • छोट्या पडद्यावर जुन्या मालिकांचे नवे पर्व
  • नवीन पर्व यशस्वी होण्याचा मार्ग अवघड
  • प्रेक्षक पुन्हा टीव्हीकडे वळतील का?

मुंबई टाइम्स टीम

सध्या छोट्या पदद्यावर जुन्या मालिकांच्या नव्या पर्वाचं वारं वाहत आहे. नुकत्याच आलेल्या ‘साथिया २’, ‘प्रतिज्ञा २’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी २’ या मालिकांप्रमाणे ‘बडे अच्छे लगते है’ आणि ‘पवित्रा रिश्ता’ यांचे नवे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण ही नवी पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आजच्या ओटीटीच्या जमान्यात मालिकांची नवीन पर्व यशस्वी होण्याचा मार्ग नक्कीच अवघड असेल, असं जाणकार सांगतात.

बॉलिवूडवाले गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वेल बनवण्यात व्यग्र आहेत. त्याचप्रमाणे छोट्या पडद्यावरसुद्धा गाजलेल्या मालिकांचे नवे सीझन आणून आधीसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘ना आना इस देस लाडो’, ‘वेहद’, ‘कवच’, ‘साथ निभाना साथिया’, ‘प्रतिज्ञा’ यासारख्या अनेक मालिकांचं दुसरं पर्व आलं. पण यातील कोणत्याच मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘पवित्र रिश्ता’ या मालिकांचे नवे सीझन लवकरच येणार आहेत. त्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या मालिकांची शीर्षकं माहीत असल्यामुळे प्रेक्षक लगेचच मालिकेकडे आकर्षित होतील, असा विश्वास निर्मात्यांना आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी मालिकांना ‘काटे की टक्कर’ द्यावी लागणार आहे.
म्हणून ‘बडे अच्छे लगते है २’ मध्ये राम आणि साक्षीला घेतलं नाही, एकता कपूरनं सांगितलं खरं कारण
नवे विषय नाहीत का?

निर्माते आणि लेखकांकडे नवे विषय नसल्याचा सूर मालिकाविश्वात उमटताना दिसतोय. तसंच निर्माते सावधगिरी बाळगत पूर्वी लोकप्रिय ठरलेला साचा पुन्हा नव्यानं प्रेक्षकांसमोर आणत असल्याचं जाणकार सांगतात. कारण मनोरंजनसृष्टीची विस्कटलेली घडी पुन्हा नीटनेटकी करण्यासाठी अधिकधिक प्रेक्षकवर्ग टीव्हीकडे वळवायचा आहे. ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री अविका गौर सांगते की, ‘यश-अपयश ही गोष्ट नाकारू शकत नाही. उत्तम काम आणि सादरीकरण करणं आम्हा कलाकारांच्या हातात आहे. गाजलेल्या मालिकेचा सिक्वेल घेऊन येणं ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी लेखकांना खूप मेहनत घ्यावी लागते’.

दुसऱ्या सीझनची जादू कमी
अनेक निर्मात्यांनी प्रेक्षकांची जुन्या मालकेची असलेली ओढ लक्षात घेऊन त्याचेच नवे सीझन आणले. पण हे नवीन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात यशस्वी ठरले नाहीत. ‘प्रतिज्ञा’ या २००९ साली आलेल्या मालिकेनं तीन वर्षं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण या मालिकेचा यंदा आलेला पुढचा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. परिणामी, मालिका काही भागांनंतर गुंडाळण्यात आली. २००२ साली आलेल्या ‘संजीवनी’ या मालिकेचं नवं पर्व २०१९ साली आणण्यात आलं. पण तो सीझन प्रेक्षकांना तितकासा आवडला नाही. निर्माती एकता कपूरने ‘कसोटी जिंदगी की’चा दुसरा सीझन आणला, पण पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिस यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भुरळ पाडण्यास कमी पडली. असंच काहीसं ‘बेहद २’, ‘कवच २’, ‘लाडो २’, ‘इस प्यार को क्या नाम दू ३’, ‘न बोले तुम न मैंने कुछ कहा २’, ‘पुनर्विवाह २’, ‘ब्रह्मराक्षस २’ या मालिकांच्या बाबतीत घडलं.
‘ती परत आलीये’ मालिकेची उत्सुकता शिगेला, ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

प्रेक्षक रमलाय आठवणींत

मालिकांचं पहिलं पर्व पाहिलं होतं तो प्रेक्षकवर्ग आता चाळीशी, पन्नाशी किंवा साठीत आहे. तर तरुण प्रेक्षक वेब सीरिज व चित्रपटांकडे वळला आहे. त्यामुळे चाळीशी ते साठीत असलेल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जुन्या मालिका आणल्या जात असल्याचं जाणकार सांगतात. जेणेकरून जुन्या मालिकांच्या आठवणींमध्ये रमत प्रेक्षक पुन्हा टीव्हीकडे वळतील. त्यासह ओटीटीकडे वळलेल्या प्रेक्षकांसाठी जुन्या मालिकांचे नवीन पर्व त्या माध्यमावर आणले जात आहेत.

संकलन- उपमा सिंह, रामेश्वर जगदाळेअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#छटय #पददयवर #जनय #मलकचय #नवय #परवच #वर #पण #नरमतयन #वटतय #ह #भत

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा

नवी दिल्ली, 04 जुलै : सीझनल फ्लू म्हणजे हंगामी ताप हा सर्व ऋतूंमध्ये आढळणारा फ्लू आहे. उन्हाळ्यात उष्माघात किंवा निर्जलीकरणामुळे होतो तर पावसाळ्यात...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...