Friday, May 20, 2022
Home क्रीडा चेन्नईविरुद्धचा विजय गुजरातला IPL ट्रॉफी जिंकण्याची आणखी एक संधी देईल

चेन्नईविरुद्धचा विजय गुजरातला IPL ट्रॉफी जिंकण्याची आणखी एक संधी देईल


मुंबई, 14 मे : आयपीएल 2022 च्या 62 व्या सामन्यात, प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आमनेसामने असतील. एकीकडे सीएसके सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, गुजरात टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. गुजरात 9 विजय मिळवून 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, आणखी एका विजयामुळे त्यांचं अव्वल 2 मध्ये स्थान निश्चित होईल. कोणताही संघ गुजरातला टॉप 2 मधून बाहेर काढू शकणार नाही. टॉप 2 मध्ये स्थान मिळवणे म्हणजे संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळते. CSK चा संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच 9व्या स्थानावर आहे.

गेल्या सामन्यात गुजरातने या मोसमात पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला होता. यासह त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान निश्चित केले होते. तर CSK ला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

गुजरातचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पुनरागमन
गुजरातच्या या गौरवशाली प्रवासात सर्वात मोठा वाटा होता तो सलामीवीर शुभमन गिल, कर्णधार हार्दिक, डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया, जे शानदार फलंदाजी करत आहेत. कठीण परिस्थितीतही पुनरागमन करणे हा टायटन्सचा सर्वात मोठा गुण आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये पांड्या, मिलर आणि तेवतिया काहीशा लयपासून दूर गेलेले दिसले. गुजरातचे बलस्थान हे त्याचे गोलंदाजी आक्रमण आहे, ज्यात मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि रशीद खानसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. शमीने आतापर्यंत 16 विकेट घेतल्या असून तो गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

अंबाती रायडूने अचानक IPL मधून निवृत्ती होण्याचं ट्विट का केलं? CSK ने उलगडलं रहस्य

अनेक गोष्टी चेन्नईच्या विरोधात
आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईबद्दल सांगायचे तर, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी त्याच्या बाजूने गेल्या नाहीत. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले, ते चुकीचे ठरले. स्पर्धेच्या मध्यावर जडेजाने पुन्हा धोनीवर ही जबाबदारी सोपवली. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या सामन्यापूर्वी घरी परतला.

याशिवाय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे याआधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. संघाला त्याची आणि अॅडम मिल्नेची उणीव भासली. मात्र, डेव्हॉन कॉनवेने मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेतला आणि त्याने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग यांनी प्रभावित केले. परंतु, दर्जेदार नवीन-बॉलरच्या कमतरतेशिवाय, मोईन अली आणि महेश दिक्षाना देखील फिरकी विभागात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चननईवरदधच #वजय #गजरतल #IPL #टरफ #जकणयच #आणख #एक #सध #दईल

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

Most Popular

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...