Saturday, August 13, 2022
Home विश्व चीनने प्रसिद्ध केला गलवान संघर्षाचा व्हिडिओ; भारतीय जवानांनी 'असा' केला प्रतिकार!

चीनने प्रसिद्ध केला गलवान संघर्षाचा व्हिडिओ; भारतीय जवानांनी ‘असा’ केला प्रतिकार!


बीजिंग: मागील वर्षी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर, चीननेही आपले काही जवान ठार झाल्याचे मान्य केले. चीनने या संघर्षातील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा ४८ सेकंदाचा व्हिडिओ असून भारतीय जवानांनी चिनी जवानांना प्रत्युत्तर दिले असल्याचे दिसून येत आहे.

चीनमधील एका वाहिनीवर गलवान खोऱ्यातील हिंसाचारात ठार झालेल्या पीएलए जवानांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सुरू असताना संघर्षाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैन्यात संघर्ष झाला असल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूने दगडफेकही झाल्याचे दिसते. काही चिनी सैनिक गलवान नदीतील प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसत आहे.

चिनी सैन्य हे उंचावरील भागात असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होते. गलवान खोऱ्यात पाण्यात उभे असलेल्या भारतीय जवानांवर चिनी सैन्याने दगडफेक केली. या व्हिडिओत रात्रीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराची दृष्ये दिसत आहे. चिनी सैन्याकडे काठी आणि धारदार शस्त्रे असल्याचे दिसत आहे. भारतीय जवानांनी मोठ्या कठीण परिस्थितीत चिनी सैन्याला प्रत्युत्तर दिले.

चीनला मोठा झटका; फिलीपाइन्स आणि अमेरिकेत झाला ‘हा’ करार!

पाकिस्तानची आगळीक; गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांतीय दर्जा देण्याच्या हालचाली
दरम्यान, चीनने याआधी आपले चार जवान ठार झाले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाच जवान ठार झाल्याची कबुली दिली. मागील वर्षी १५ जून रोजी झालेल्या संघर्षात ठार झालेल्या जवानांबाबत चीनने काही महिने तोंड उघडले नव्हते. भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या लष्करी चर्चेत चिनी अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केली. चीनने गलवान खोऱ्यात ठार झालेल्या जवानांना मरणोत्तर वीर पुरस्कारही दिले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#चनन #परसदध #कल #गलवन #सघरषच #वहडओ #भरतय #जवनन #अस #कल #परतकर

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...