हायलाइट्स:
- ‘लव्ह यू राचू’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेत स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यू
- स्टंटमॅनच्या निधनानंतर पोलिसांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याला केली अटक
- चित्रपटातील अॅक्शन सीनचं शूटिंग सुरू असताना स्टंटमॅनला लागला विजेचा धक्का
रिपोर्ट्सनुसार, ही घटना सोमवारी घडली. चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना विकेक विजेच्या तारांच्या संपर्कात आला. स्टंट करत असताना त्याच्या शरीराला धातूचा दोर बांधलेला असल्यानं विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका स्टंटमॅनलाही विजेचा धक्का बसला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी स्टंट डायरेक्टर विनोद, दिग्दर्शक शंकर आणि निर्माता गुरु देशपांडे यांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेता कृष्णा अजय राव याप्रकरणी प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, ‘मागच्या काही दिवसांपासून आम्ही चित्रपटातील स्टंट सीनचं शूटिंग करत आहे. तिथे नक्की काय घडलं हे मला नीट माहीत नाही कारण त्यावेळी मी शूटिंग लोकेशनपासून थोडा दूर होतो. त्यामुळे ही दुर्घटना मी जवळून पाहिलेली नाही. पण मला जोरात ओरडण्याचा आवाज आला होता आणि त्यानंतर या अपघाताची माहिती मिळाली. आमच्या सर्वांसाठीच हे धक्कादायक होतं.’
कृष्णा पुढे म्हणाले, ‘स्टंट डायरेक्टर्सना त्यांच्या कामात हस्तक्षेप केलेला आवडत नाही. त्यामुळे त्यांना कोणताही सल्ला देणं कठीण असतं. मी सुरुवातीलाच सेटवरील काही लोकांना स्टंट करताना मेटलच्या दोराचा वापर करणं कितपत सुरक्षित आहे हे विचार होतं. आता जोपर्यंत विवेकला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शूटिंग सुरू करणार नाही.’
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#चतरपटचय #सटवरल #दरघटनत #सटटमनच #जगच #मतय #नरमत #दगदरशकल #अटक