दाताचे प्रॉब्लेम्स –
चिंचेला अधिक आंबट चव असते, ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास दातांना नुकसान होऊ शकते. चिंच जास्त प्रमाणात खाल्ल्यास दातांच्या इनॅमलमधील आम्ल घटकामुळे कीड लागण्याची शक्यता असते. जास्त चिंच खाल्ल्याने दात खराब दिसतात.
अॅलर्जी होऊ शकते –
अॅलर्जी हा चिंचेचा सर्वात कॉमन तोटा आहे. चिंच आवडीने खाणाऱ्या अनेकांना याबाबत माहिती नाही की, चिंच खाल्ल्याने डाग, खाज सुटणे, सूज येणे, चक्कर येणे, मूर्च्छा येणे, उलट्या होणे, धाप लागणे असे अनेक त्रास होऊ शकतात.
अॅसिड रिफ्लेक्स –
चिंच हे आम्लयुक्त फळ आहे. ते आपण खातो तेव्हा पोटातील अॅसिडची पातळी गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये वाढते. ‘अॅसिड रिफ्लक्स’ सारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चिंच कमी खाल्लेली बरी.
हे वाचा – Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय
वेसो कंस्ट्रिक्शन वाढते –
आपण कोणत्याही प्रकारची औषधं वापरत असाल तर चिंच खाणे टाळावे. अशावेळी चिंचेच्या अतिसेवनाने रक्तपेशी संकुचित होऊ शकतात.
लॅक्सेटिव इफेक्ट वाढतात –
चिंचेचा कोळ त्याच्या लॅक्सेटिव गुणधर्मांसाठी ओळखला जातो. जर आपण आधीपासून कोणतीही औषधं वापरत असाल तर चिंच खाणे टाळावे.
हे वाचा – Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे
रक्तातील साखरेची पातळी –
चिंचेचे अधिक सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. साखरेचे रुग्ण आधीच मधुमेहाचे कोणतेही औषध घेत असतील तर चिंच टाळावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#चच #महटल #क #तडल #पण #सटत #न #एकद #तयच #सईड #इफकट #समजन #घय