Saturday, May 21, 2022
Home विश्व चमत्कार! शेकडो लोकांचा बळी गेला पण 9 वर्षीय चिमुकला एकटाच प्लेन क्रॅशमधून...

चमत्कार! शेकडो लोकांचा बळी गेला पण 9 वर्षीय चिमुकला एकटाच प्लेन क्रॅशमधून बचावला


ट्रायपोली, 14 मे : एखादं प्लेन क्रॅश झालं तर त्यातून कुणी वाचणं अशक्यच. अशाच भयंकर विमान दुर्घटनेत शेकडो लोकांचा जीव गेला पण यातून एक चिमुकला मात्र एकटाच बचावला. विमान अपघातातून हा चिमुकला बचावणं म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या चिमुकल्याला आता देवदून म्हटलं जातं आहे (9 Year old child sole survivor in plane crash).
रुबेन वन असौ असं या मुलाचं नाव आहे. 103 लोकांचा मृत्यू झालेल्या विमान दुर्घटनेतून हा 9 वर्षांचा चिमुकला वाचला आहे. त्याने मृत्यूलाही मात दिली आहे.  लीबियाच्या ट्रायपोली एअरपोर्टवर विमानावर प्लेन क्रॅश झालं, त्या विमानात हा मुलगा होता.
12 वर्षांपूर्वी घडलेली ही दुर्घटना. लिबियात 12 मे 2010 साली विमान अपघात झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. लीबियामध्ये ते क्रॅश झालं. एअरपोर्टच्या रन-वेजवळच हे विमान क्रॅश झालं होतं. विमान जमिनीवर धडकणार त्याआधीच हा मुलगा विमानातून बाहेर पडला. तो बाहेर आला आणि लगेच प्लेन जमिनीवर आदळलं आणि मोठा ब्लास्ट झाला. विमानाचे तुकडेतुकडे झाले. या दुर्घटनेत या मुलाच्या आई-वडिलांचीही मृत्यू झाला आहे.
हे वाचा – कपडे काढून वॉटरफॉलखाली झोपला, अचानक कोसळला साप आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO
उपचारादरम्यान त्याला तो कुठला असल्याचं विचारलं तेव्हा त्याने हॉलँडचा असल्याचं सांगितलं. अशा भयंकर विमान अपघातातून बचावलेला हा मुलगा चौदावी व्यक्ती आहे. त्याचे पाय मोडले पण त्याचा जीव वाचला. त्याचे नातेवाईक त्याची काळजी घेत आहेत. तिलबुर्गच्या योरे एलिमेंट्री स्कूलमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं. आता तो सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा आकाश स्वच्छ होतं. सर्वकाही नीट दिसत होतं. त्यामुळे वातावरणामुळे ही दुर्घटना होऊच शकत नाही. यामागे दहशतवाद्यांचा कट असल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#चमतकर #शकड #लकच #बळ #गल #पण #वरषय #चमकल #एकटच #पलन #करशमधन #बचवल

RELATED ARTICLES

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Most Popular

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर चुकून पण खाऊ नका या गोष्टी; त्रास जास्तच वाढेल

नवी दिल्ली, 21 मे : बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा...

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

असे झाले अंकुशचे शाहीर साबळे, दिग्दर्शकाने शेअर केला Making Video

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा केली. शाहीर साबळेंवरच्या या सिनेमात शाहिरांची भूमिका करतोय अंकुश चौधरी....

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

आरोग्यदायी आहे म्हणून जास्त पालक खाऊ नका; त्याचे दुष्परिणाम एकदा जाणून घ्या

नवी दिल्ली, 21 मे : हिरव्या भाज्या हा प्रत्येकाच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक आहारतज्ज्ञ हिरव्या भाज्या...