औषधी गुणधर्म असलेल्या पुदिन्यामध्ये अॅण्टी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक असतात. पुदिन्याचा वापर करून आपण घरातील बॅक्टेरिया आणि बुरशी काही वेळात घालवू शकतो. याशिवाय इतर काही गोष्टींच्या स्वच्छतेसाठी उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर करण्याच्या काही खास टिप्स जाणून घेऊया. ज्यामुळे स्वच्छतेसाठी आपल्याला इतर कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
स्नानगृह स्वच्छता –
बाथरूममधील खराब वास घालवण्यासाठी आणि सिंकमधील घाण दूर करण्यासाठी आपल्याला फ्रेशनर किंवा डेटॉलसारख्या महागड्या गोष्टींचा वापर करावा लागतो. पण, कमी खर्चात पुदिना यावर चांगला पर्याय आहे. यासाठी पुदिन्याची पाने 2 कप पाण्यात मिसळून बारीक करा. आता या मिश्रणात 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 कप पाणी घालून द्रावण तयार करा. हे द्रावण स्प्रे बाटलीत भरून आठवड्यातून 2-3 वेळा बाथरूममध्ये फवारावे. यामुळे सिंकची घाण आणि बाथरूमची दुर्गंधी लगेच निघून जाईल.
स्वयंपाकघर होईल क्लीन –
स्वयंपाक घरातील डस्टबिन आणि सिंकमध्ये अळ्या-किडे होऊ नयेत, म्हणून आपण पुदिना देखील वापरू शकतो. यासाठी 1 कप पाण्यात मिसळून पुदिन्याची पाने बारीक करा. आता त्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाची स्वयंपाकघरात फवारणी केल्याने कीटकांची समस्या पूर्णपणे दूर होईल.
हे वाचा – लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत
वनस्पतींची काळजी घेण्यासाठी –
घरातील किंवा बागेतील रोपांवर असलेल्या कीटकांवर देखील पुदीना खूप प्रभावी आहे. यासाठी 1 कप पाण्यात पुदिन्याची पाने बारीक करून घ्या. आता या द्रावणात बेकिंग सोडा टाका आणि स्प्रे बाटलीत भरा. या स्प्रेने वेळोवेळी फवारणी केल्यास झाडांमधील कीटक आपोआप नाहीसे होतील.
हे वाचा – लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत
मुंग्यांना पळवून लावा –
विशेषतः उन्हाळ्यात घराच्या अनेक कोपऱ्यांमध्ये मुंग्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत मुंग्यांना घालवण्यासाठी आपण पुदिन्याची फवारणी देखील करू शकतो. तसेच, मिंट स्प्रे घरातील इतर भागामध्येही कीटकांसाठी खूप प्रभावी आहे. याशिवाय डाळी आणि तांदळाच्या डब्यात पुदिन्याची काही पाने ठेवल्यास किडींपासून वाचवता येते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#चटण #आण #औषध #गणधरमशवय #पदनयच #घरत #इतकय #कमसठ #आह #उपयग