Saturday, August 13, 2022
Home क्रीडा चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी टीमचा कोच 'कबीर खान'

चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी टीमचा कोच ‘कबीर खान’


मुंबई: टोकियो  ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी टीम ने इतिहास रचला आहे.  बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या  इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.  महिला खेळाडूंनी मैदान गाजवलं खरं पण या विजयामागे आणखी एका व्यक्तीचा हात आहे. 

तुम्हाला शाहरूख खानचा चक दे इंडिया सिनेमा आठवतच असेल.  शाहरूखने साकारलेल्या प्रशिक्षक कबीर खानने महिला खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण  केला. आपण जिंकू शकतो हा विश्वास दिला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीमागेही अशाच एका कबीर खानचा हात आहे. ती व्यक्ती आहे, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड  मारजेन. 

चार वर्षांपूर्वी मारजेन यांनी मारजेन यांनी भारतीय महिला हॉकी संघाची सूत्र हाती घेतली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती.  त्यावेळी भारतीय महिला हॉकी संघ रिकाम्या हाताने मायदेशी परतली होती. संघातील अनेक सिनियर खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.  अशा परिस्थितीत मारजेन यांच्या हातात सूत्र देण्यात आली.  मारजेन यांच्या समोर आव्हान होतं संघाला पुन्हा उभं करण्याचं. मारजेन यांनी हे आव्हान स्वीकारलं. 

मारजेन यांनी एक मास्टर प्लान तयार केला. सर्वात आधी त्यांनी खेळाडूंच्या मानसिकतेवर अभ्यास केला.  आपण जिंकू शकतो हा विश्वास त्यांनी खेळाडूंमध्ये निर्माण केला. मारजेन यांनी  आखलेली रणनीती यशस्वी ठरतेय. आणि याचं उदाहरण आपल्याला मैदानावर दिसत आहे. भारतीय महिला खेळाडू एकजुटीने आणि जिंकण्याचा जिद्दीने खेळतायत.  

उपान्त्यपूर्व फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयाचा सर्वाधिक आनंद झाला असेल तो प्रशिक्षक सोर्ड मारजेन यांना. विजयानंतर मारजेन यांच्या डोक्यात अश्रू होते. पण हे अश्रू होते विजयाचे, हे अश्रू होते आनंदाचे, हे अश्रू होते करोडो भारतीयांना दिलेल्या अभिमानाचे. म्हणूनच भारतीय महिला हॉकी संघाच्या या रिअल कबीर खान अर्थात सोर्ड मारजेन यांना करोडो भारतीयांचा सलाम.

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चक #द #इडय #भरतय #महल #हक #टमच #कच #कबर #खन

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...