Friday, August 12, 2022
Home क्रीडा चक दे इंडिया, भारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास, सुवर्णपदकापासून फक्त दोन...

चक दे इंडिया, भारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास, सुवर्णपदकापासून फक्त दोन पावले दूर…


टोकियो : भारताच्या महिला हॉकी संघाने आज इतिहास रचला. भारताने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव केला. पण या पराभवाबरोबर भारताच्या संघाने इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर सुवर्णपदकापासून आता फक्त दोन पावले दूर आहे. भारताच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत एकदाही प्रवेश केलेला नव्हता. भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता, त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत १९८०, २०१६ आणि आता २०२१-२२ या तीन ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रवेश केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण यावेळी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या गुरजित कौरने हा गोल केला होता.

पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताच्या मोनिका मलिकला यावेळी ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली. पण त्यानंतरही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यामुळे यापुढच्या ३० मिनिटांच्या खेळावर भारतीय संघ इतिहास घडणार की नाही, हे अवलंबून होते. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#चक #द #इडय #भरतचय #महल #हक #सघन #रचल #इतहस #सवरणपदकपसन #फकत #दन #पवल #दर

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

<p>मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...