Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल घरासाठी प्लॉट खरेदी करताना या 8 गोष्टींची काळजी घ्या; नंतर पश्चाताप नाही...

घरासाठी प्लॉट खरेदी करताना या 8 गोष्टींची काळजी घ्या; नंतर पश्चाताप नाही होणार


मुंबई, 23 जून : वास्तुदोषांपासून मुक्त असलेले सुंदर घर असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. घर आधीच बांधलेले असेल तर त्यातील वास्तुदोष काही उपायांनी दूर करता येतात. जर तुम्ही घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी करणार असाल आणि तो वास्तू (Vastu) दोषांपासून मुक्त ठेवू इच्छित असाल तर तुम्ही फक्त वास्तूशास्त्रानुसार प्लॉट खरेदी करा. वास्तुशास्त्रानुसार प्लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयी तिरुपतीचे ज्योतिषी आणि आर्किटेक्ट डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून (Vastu Tips) घेऊया.
वास्तूनिहाय घराचा प्लॉट

1. घर बांधण्याचा प्लॉट चौकोनी किंवा आयताकृती असेल तर ते शुभ राहील. म्हणजेच कोणत्याही आकाराच्या जमिनीवर इमारत बांधणे योग्य नाही. तरीही त्यावर घर बांधायचे असल्यास त्या भूखंडाचा चौकोनी किंवा आयताकृती भाग काढून इमारत बांधावी व उरलेल्या भागावर झाडे इ.ची लागवड करावी.

2. ज्या जमिनीला भेगा आहेत, वाळुकामय आहे किंवा दीमक आहे, तेथे इमारत बांधू नये.
3. ज्या जमिनीवर शेती आहे, झाडे-झाडे झपाट्याने वाढतात, जमिन सपाट असते, पाण्याची पातळीही जास्त खाली नाही असा तो प्लॉट घरासाठी चांगला मानला जातो.

4. दोन मोठ्या भूखंडांमध्ये अरुंद भूखंड असल्यास तो घर बांधण्यासाठी योग्य मानला जात नाही.

5. जर प्लॉटची लांबी पूर्व आणि पश्चिम दिशेला जास्त आणि उत्तर आणि दक्षिण दिशेला कमी असेल तर ते घरासाठी चांगले आहे.

हे वाचा – ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या

6. जर प्लॉटचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर ते घर बांधण्यासाठी योग्य आहे. हा उतार दक्षिण किंवा पश्चिमेला नसावा.

7. घर बांधताना पूर्व किंवा उत्तर दिशेला रिकामी जागा सोडणे चांगले. वास्तूनुसार दक्षिण किंवा पश्चिमेला रिकामी जागा ठेवू नका.

हे वाचा – नाक, तोंड नाही तर शरीराच्या ‘या’ अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

8. प्लॉटच्या आजूबाजूला किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला रस्ता असेल तर तो प्लॉट घरासाठी योग्य मानला जातो. याशिवाय अन्य दिशेला रस्ता असल्यास तो भूखंड इमारत बांधकामासाठी मध्यम श्रेणीचा मानला जातो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#घरसठ #पलट #खरद #करतन #य #गषटच #कळज #घय #नतर #पशचतप #नह #हणर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...