Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट घरच बनेल थिएटर! अवघ्या १० हजारात लाँच झाला ‘या’ कंपनीचा भन्नाट Smart...

घरच बनेल थिएटर! अवघ्या १० हजारात लाँच झाला ‘या’ कंपनीचा भन्नाट Smart TV, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली :Thomson Smart TV Launched: फ्रेंच इलेक्ट्रॉनिक ब्रँड Thomson ने आपल्या नवीन स्मार्ट टीव्हीला भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने 32-inch Alpha Series Smart TV ला सादर केले आहे. या टीव्हीची किंमत खूपच कमी असून, डिझाइन स्टाइलिश आहे. Thomson च्या या Smart TV ची किंमत फक्त ९,९९९ रुपये आहे. म्हणजेच, जे लोक १० हजारांच्या बजेटमध्ये टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. म्हणजेच अवघ्या ९,९९९ रुपयात तुम्हाला घरातच थिएटरचा आनंद मिळेल. थॉमसनचा हा टीव्ही दमदार फीचर्ससह येतो. Thomson 32-inch Alpha Series Smart TV विषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Jio च्या सर्वात स्वस्त प्लान्ससमोर Airtel-Vi फेल, तब्बल ३३६ दिवसांच्या वैधतेसह मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

Thomson 32-inch Alpha Series Smart TV चे स्पेसिफिकेशन्स

Thomson च्या Alpha Series Smart TV मध्ये शानदार ३२ इंच टीव्ही एचडी रेडी स्क्रीन दिली आहे. टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह येतो. यात पॉवरफुल सराउंड साउंड मिळतो. Thomson चा हा टीव्ही युट्यूब, प्राइम व्हिडिओ, सोनी लिव्ह, झी५, इरोज नाउ सारख्या प्रमुख अ‍ॅप्ससह येतो. टीव्हीमध्ये ३० वॉटचे शानदार स्पीकर दिले आहेत. हा टीव्ही ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेजसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी, वाय-फाय, एचडीएमआयसह अनेक फीचर्स मिळतात.

वाचा: Best Smartphone: नवीन फोन खरेदी करायचाय? १० हजारांच्या बजेटमधील बेस्टसेलर स्मार्टफोन्सची ‘ही’ लिस्ट पाहाच

दरम्यान, Thomson ने वर्ष २०१८ मध्ये आपल्या स्मार्ट टीव्ही लाइनअपसह भारतीय बाजारात प्रवेश केला होता. तेव्हापासूनच कंपनीच्या स्मार्ट टीव्हींना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनी सातत्याने भारतीय ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट्सला सादर करत आहे. Thomson 32-inch Alpha Series Smart TV हा २६ जूनपासून ई-कॉमर्स साइट Flipkart वर उपलब्ध होईल. दरम्यान, ग्राहकांना टीव्हीवर एसबीआय बँक क्रेडिट कार्ड्सने पेमेंट केल्यास १० टक्के सूट मिळेल. याशिवाय, मोफत गाना प्लसचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. दरम्यान, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अवनीत सिंह मारवाह हे टीव्हीच्या लाँचिंगबाबत बोलताना म्हणाले की, Thomson 32-inch Alpha Series Smart TV ला लाँच करताना उत्साहित आहोत. ग्राहकांना डिजिटल इंडियाचा भाग बनवण्याचा प्रयत्न आहे. हा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्हींपैकी एक आहे. हे कंपनीचे तिसरे प्रोडक्ट लाँच असून, पुढे देखील नवीन प्रोडक्ट्स सादर केले जातील.

वाचा: iPad आणि iPod मध्ये नक्की काय फरक? पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#घरच #बनल #थएटर #अवघय #१० #हजरत #लच #झल #य #कपनच #भननट #Smart #पह #डटलस

RELATED ARTICLES

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

Most Popular

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा...

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...