सिद्धार्थ त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाला, ‘अशा अफवा कोण पसरवतं मला माहिती नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठिक आहे’. मागच्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी वेगळं राहत असल्याचं म्हटलं जात होतं. यावर बोलताना सिद्धार्थनं ‘सबकुछ ठिक हैं’, असं म्हणत जास्त बोलण्यास नकार दिला. यावरुन तरी सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्यात खूश असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – ‘एक पाऊल नव्या साहसाच्या दिशेने…’; मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट
असं असलं तरी सिद्धार्थ नुकताच दुबई ट्रिप करुन आला. सिद्धार्थ मुली स्वरा आणि इरा यांच्याबरोबर दुबईला गेला होता. मुलींबरोबरचे फोटो देखील त्यानं शेअर केले होते. मात्र याच पत्नी तृप्ती कुठेही दिसली नाही. ती का गेली नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आजही पडला आहे. त्याचप्रमाणे ई टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्ष सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र राहत नाहीत. दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर दोघांनी दोन वर्षात एकमेकांबरोबर एकही पोस्ट किंवा फोटो शेअर केलेली नाही. मात्र सिद्धार्थच्या या स्पष्टीकरणानंतर या सगळ्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
सिद्धार्थच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर सिद्धार्थ सध्या त्याच्या करिअरच्या पिक पॉईंटला आहे. काही दिवसात सिद्धार्थचा ‘तमाशा लाईव्ह’ ( Tamasha Live) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे धनाजी गँग घेऊन ‘दे धक्का 2’ ( De Dhakka 2) या सिनेमातही सिद्धार्थ आपल्याला दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#घटसफटचय #चरचवर #भडकल #सदधरथ #जधव #महणल #सगळ #कह