Thursday, July 7, 2022
Home क्रीडा ग्रेट मेसी आता PSG कडून खेळणार, कराराची रक्कम ऐकून बसेल शॉक

ग्रेट मेसी आता PSG कडून खेळणार, कराराची रक्कम ऐकून बसेल शॉक


लिओनेल मेसीला मिळाला नवा क्लब

बार्सिलोनामधून बाहेर पडलेला लिओनेल मेसी (Lionel Messi) आता पीएसजी (PSG) क्लबकडून खेळणार आहे. 34 वर्षांचा मेसी पॅरिस सेंट जरमेनसोबत (Paris Saint-Germain) दोन वर्षांचा करार करणार आहे.

मुंबई, 10 ऑगस्ट : बार्सिलोनामधून बाहेर पडलेला लिओनेल मेसी (Lionel Messi) आता पीएसजी (PSG) क्लबकडून खेळणार आहे. 34 वर्षांचा मेसी पॅरिस सेंट जरमेनसोबत (Paris Saint-Germain) दोन वर्षांचा करार करणार आहे. या करारानुसार मेसीला पीएसजी प्रत्येक वर्षी तब्बल 25 मिलियन पाऊंड मिळणार आहेत, तसंच तिसऱ्या वर्षी मेसी त्याचा करार वाढवू शकतो, यासाठी त्याला 25 मिलियन पाऊंड सायनिंग ऑन फी म्हणून देण्यात येईल. बार्सिलोनाबरोबर मेसी आणखी पाच वर्षांचा करार करणार होता, पण हा करार फसला. यानंतर त्याने पीएसजीसोबत दोन वर्षांचा करार करण्याचा निर्णय घेतला.
पीएसजीसोबत करार करण्यासाठी मेसी मंगळवारी दुपारी पॅरिसला जाणार आहे. पीएसजी हा पॅरिस क्लब मेसीला 25 मिलियन पाऊंड टॅक्स कापून आणि बोनस मिळून देणार आहे. बार्सिलोनामधून (Barcelona) बाहेर पडल्यानंतर मेसीकडे दोन पर्याय होते, यात त्याने पीएसजीसोबत जायचा निर्णय घेतला.
21 वर्ष मेसी बार्सिलोनासोबत राहिला, यानंतरही बार्सिलोना मेसीसोबत 5 वर्षांचा करार करेल, असं बोललं जात होतं, पण क्लबने आपली आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याचं सांगितलं, त्यामुळे हा करार होऊ शकला नाही.
बार्सिलोना सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेसी ढसाढसा रडला. मला बार्सिलोनासोबतच राहायचं होतं, यासाठी मी वाटेल ते प्रयत्नही केले. मानधनामध्ये 50 टक्के कपात करण्यासाठीही आपण तयार होतो, असं मेसीने सांगितलं. तसंच पीएसजी हा एक पर्याय असल्याचंही मेसी म्हणाला होता.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गरट #मस #आत #PSG #कडन #खळणर #कररच #रककम #ऐकन #बसल #शक

RELATED ARTICLES

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

Most Popular

MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; ‘हे’ ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने अशी कामगिरी...

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

<p>सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या...