Saturday, July 2, 2022
Home क्रीडा 'गोल्ड बॉय' नीरज चोप्रा करणार आता विजयाचे भन्नाट सेलिब्रेशन, जाणून घ्या काय...

‘गोल्ड बॉय’ नीरज चोप्रा करणार आता विजयाचे भन्नाट सेलिब्रेशन, जाणून घ्या काय आहे प्लॅन


नवी दिल्ली : नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. या पदकासाठी नीरजने बऱ्याच गोष्टींचा त्याग केला होता. पण आता सुवर्णपदक जिंकल्यावर नीरज भन्नाट सेलिब्रेशन करणार आहे. या सेलिब्रेशनचा प्लॅन काय आहे, याचा खुलासाही आता नीरजने केला आहे.

नीरज कसं करणार सुवर्णपदकाचं सेलिब्रेशन पाहा…
नीरज बरेच दिवस घरापासून लांब होता, कारण तो ऑलिम्पिकच्या सरावात व्यस्त होता. पण आता सुवर्णपदक जिंकल्यावर तो आपल्या घरी जाणार असून पहिल्यांदा आईचा आशिर्वाद घेणार आहे. खेळाडूंचा जेव्हा सराव चालू असतो तेव्हा त्यांना बऱ्याच पदार्थांचा त्याग करावा लागतो. पण आता घरी पोहोचल्यावर पहिल्यांदाच चुरमा खाणार आहे. त्याचबरोबर आईच्या हाताने बनलेल्या पदार्थांवर ताव मारत आपण सेलिब्रेशन करणार असल्याचे आता नीरजने सांगितले आहे.

नीरजला आता काय बक्षिसं मिळणार आहेत, पाहा…
भारतासाठी अॅथलेटीक्समधील पहिले पदक तेही सुवर्ण जिंकून देणाऱ्या नीरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला नसला तर नवलच. महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी भेट देणार असल्याची घोषणा केली आहे. अॅथलेटिक्समध्ये देशाला १२१ वर्षात एकही पदक मिळाले नव्हते. पदकाचा हा दुष्काळ नीरजने सुवर्ण पटकावून भरून काढला. नीरज भारतीय लष्करात सुभेदार म्हणून कार्यरत आहे. तो राजपूताना रायफल्सच्या तुकडीत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवण्याआधी नीरजला लष्कराकडून विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले गेले होते. २०१८ साली नीरजचा अर्जून पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. आता ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर लष्कराकडून बढती दिली जाऊ शकते. नीरज २०१६ साली लष्करात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला मिशन ऑलिम्पिक विंगसाठी लष्कराच्या पुण्यातील इन्स्टीट्यूमध्ये निवडण्यात आले होते. भारतीय लष्कराने ऑलिम्पिकसाठी वेगवेगळ्या खेळातील ११ जणांना निवडले होते. त्यामुळे आता नीरजला नेमकी कोणती पोस्ट मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर सरकारबरोबर बऱ्याच कंपन्यांनी नीरजला बक्षिसं जाहीर केली आहेत. आता त्याचा सत्कार करत त्याला ही बक्षिसं काही दिवसांत देण्यात येतील.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गलड #बय #नरज #चपर #करणर #आत #वजयच #भननट #सलबरशन #जणन #घय #कय #आह #पलन

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

कॅन्सरची लागण झाल्यावर टॉयलेट दरम्यान दिसतात ही २ लक्षणं, ९० टक्के रुग्णांना असते ही समस्या, अजिबातच दुर्लक्ष करू नका

Cancer Symptoms : तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा तुम्हाला रोजच्या पेक्षा काही गोष्टी असमान्य वाटतात. तर लगेचच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही गोष्ट...

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आरोप

पुणे : भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला...

राशिभविष्य : भाग्याची साथ, आर्थिक लाभ; जुलै महिन्याचा पहिला दिवस उत्तम जाणार

आज दिनांक 01 जुलै 2022. वार शुक्रवार. तिथी आषाढ शुक्ल द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. पाहूया...

..तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? ही भाजपची तात्पुरती सोय आहे का?

मुंबई, 30 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता नवीन वळय मिळालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट...

पाक तुरुंगात 682 भारतीय कैद, पाकिस्तानची कबुली

Indian Prisoner In Pakistan Jail: पाकिस्तानने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या तुरुंगात 682 भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानने...

विराट कोहलीवर ओढवली मोठी नामुष्की, बाद झाल्याचा Video पाहाल तर कपाळावर हात माराल

बर्मिंगहम : विराट कोहलीचं सध्या चाललंय तरी काय, हा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे. कारण या सामन्या विराट ज्या पद्धतीने बाद झाला...