Monday, July 4, 2022
Home करमणूक गोलमाल है भाई सब गोलमाल! आमिर आणि किरणचा तो फोटोपाहून नेटकऱ्यांनी केलं...

गोलमाल है भाई सब गोलमाल! आमिर आणि किरणचा तो फोटोपाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


मुंबई: गेल्या दीड दोन महिन्यांपासून सिनेसृष्टीत चर्चा आहे ती अभिनेता आमिर खानच्या घटस्फोटाची. त्यानं आणि किरण रावनं विभक्त होण्याचा निर्णय घोषित केला. घटस्फोटानंतरही दोघं अनेकदा एकत्र पाहायला मिळतात.

आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्का बसला होता. चाहत्यांनी काळजी करू नये, यापुढंही आम्ही एकत्र काम करत राहू आणि पालक म्हणून आमची जबाबदारी पूर्ण करू, असं या दोघांनी सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांनी लेह-लडाख इथं आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचं काम पूर्ण केलं. या दरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि व्हायरल झाले होते.

आमिर आणि किरणसह या चित्रपटाच्या टीमनं कारगिल भागातल्या सारोखा, थांग, वाखा या परिसरात चित्रपटाचं काम केलं. त्यानंतर गावकऱ्यांसोबत या मंडळींनी पार्टीही केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होतं त्यात आमिर आणि किरण या दोघांनी पारंपरिक पेहरावात नृत्यही केल्याचं दिसत होतं.

आता पुन्हा एकदा आमिर आणि किरण विमानतळावर एकत्र दिसले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आझादही होता. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. गोलमाल है भाई सब गोलमाल, असं एकानं म्हटलं आहे तर खरंच तुम्ही घटस्फोट घेतला आहे काय़ असा प्रश्न विचारला आहे.

सोशल मीडिया कमेंन्ट्स

एकत्रितपणे काम करू
चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसंच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू, असं आमिर आणि किरण यांनी स्पष्ट केलंय. घटस्फोटानंतर दोघंही पुन्हा एकदा एकत्र कॅमेऱ्यासमोर आले होते. पाणी फाऊंडेशन संदर्भात एका लाइव्ह सेशनमध्ये संवाद साधताना आमिर आणि किरण राव यांनी त्यांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं होतं. ‘तुम्हाला दु:खही झालं असेल, धक्का बसला असेल, पण आम्हाला हे सांगायचं आहे की, आता आम्ही दोघंही खूप खुश आहोत, एकच कुटुंब आहोत, फक्त आमच्या नात्यात आता बदल झालाय. पण आम्ही एकमेकांबरोबरच आहोत. पाणी फाऊंडेशन हे आम्हाला आमच्या मुलाप्रमाणेच आहे. जसा आझाद आहे तसं पाणी फाऊंडेशन आहे. आम्ही आनंदी राहावं यासाठी प्रार्थना करा एवढंच सांगायचं आहे’, असं आमिरनं या लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं होतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गलमल #ह #भई #सब #गलमल #आमर #आण #करणच #त #फटपहन #नटकऱयन #कल #टरल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

लवकर वजन कमी करण्यासाठी रोज या पदार्थाचे सेवन करा, लगेच फरक दिसेल

मुंबई :  सध्या बरेच लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, ज्यामुळे ते वजन न वाढण्यासाठी किंवा असलेले वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करतात. परंतु...

2022 Movies : भारतीय सिनेमांनी केली सर्वाधिक कमाई

Highest Grossing Movies of 2022 : 'केजीएफ 2', 'आरआरआर', 'विक्रम', 'वलीमाई', 'बीस्ट', 'द कश्मीर फाइल्स'; 'भूल भुलैया 2',...

India COVID-19 Update : देशात कोरोनाचे 16 हजार 103 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू

India Coronavirus Update : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून...

सलाम! लष्करानं विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा, VIDEO

मुंबई, 3 जुलै : भारतीय लष्करानं (Indian Army) साऱ्या देशाला अभिमान वाटावी अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath...

शिवसेनेचे हिंदूत्व सामान्य माणसाच्या हिताचे..

हर्षल प्रधान शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर भारतीय जनता पक्षाच्या हिंदूत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झालेला आहे. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपच्या लेखी हिंदूत्व हे...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत मोठी चूक; निवासस्थानात अज्ञात व्यक्ती घुसली

CM Mamata Banerjee Security: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर येत आहे....