Monday, July 4, 2022
Home विश्व गेल्या दोन महिन्यापासून बांग्लादेशी जोडप्याचा पोलीस स्टेशनमध्येच मुक्काम, पुणे पोलिसचंच उचलतायत राहण्या-खाण्याचा...

गेल्या दोन महिन्यापासून बांग्लादेशी जोडप्याचा पोलीस स्टेशनमध्येच मुक्काम, पुणे पोलिसचंच उचलतायत राहण्या-खाण्याचा खर्च; वाचा सविस्तर


पुणे, 11 ऑगस्ट: गेल्या दोन महिन्यांपासून पुण्याच्या (Pune) फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) एक बांग्लादेशी (Bangladeshi Couple) जोडपं राहत आहे. बांग्लादेशात राहणारं हे जोडपं तीन वर्षांपूर्वी एका एजंटच्या मदतीनं पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर कागदपत्रांची (illegal paper) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं पोलिसांच्या कचाट्यात सापडले.

हे प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टानं दोघांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यावर्षी जून महिन्यात दोघांची शिक्षा पूर्ण झाली आणि येरवडा कारागृहातून सुटून पोलीस स्टेशनमध्ये आले. गेल्या दोन महिन्यांपासून पुणे पोलिसांची टीम सतत बांग्लादेशातील हाय कमीशनला त्यांना परत घेऊन जाण्यासाठी अपील करत आहे. मात्र कागदपत्रांमुळे हे प्रकरण लांबत चाललं आहे. दैनिक भास्करनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

फरासखाना पोलीस स्टेशनचे अधिक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितलं, मोहम्मद मंडल आणि माजिदा मंडल हे दोघंही बांग्लादेशातल्या खुलना जिल्ह्यातले आहेत. 26 जून 2019 ला हे पुण्यात आले होते आणि बुधवार पेठमध्ये राहत होते. आम्हाला माहिती मिळाली की, हे जोडपं अवैध कागदपत्रांद्वारे भारतात आले. आमच्या टीमनं त्या दोघांना संबंधित गुन्ह्याखाली अटक केली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि त्या दोघांना दोन वर्षांची शिक्षा झाली. 14 जून रोजी दोघांची शिक्षा संपली आणि कोर्टानं पुणे पोलिसांना या दोघांना पुन्हा बांग्लादेशाला पाठवण्यास सांगितलं.

‘नाशिक मिसळ’ला राज्यभर लौकिक मिळवून देणाऱ्या आजी कालवश; सीताबाई मोरे यांचं निधन

पुणे पोलीस उचलतंय दोघांच्या खाण्या-पिण्याचा खर्च

राजेंद्र लांडगे यांनी सांगितलं की, गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही बांग्लादेशच्या दूतावासाची संपर्क करत आहोत. मात्र तिथून काही प्रतिसाद अद्याप आला नाही आहे. कोर्टाच्या आदेशाचं पालन करत आम्ही त्यांना पोलिसांच्या कॅम्पसमध्ये राहण्याची परवानगी देत ​​आहोत. त्यांच्या तीन वेळच्या खाण्याचा आणि दोन वेळेच्या नाश्ताची सोय देखील आम्हीच करत आहोत.

पुढे लांडगे यांनी म्हटलं की, पती पत्नी दोघंही दोन वेळेस पोलीस स्टेशनमध्येच नमाज पडतात. बकरी ईदच्या वेळी पोलिसांनीच त्यांना नवीन कपडे दिले होते. या दोघांना दोन मुलं असून ते बांग्लादेशमध्ये आहेत. या जोडप्याला आता पुन्हा बांग्लादेशमध्ये जायचं आहे. आम्ही बांग्लादेशच्या हाय कमीशनला अपील करतो की, कृपया लवकरात लवकर या प्रकरणावर निर्णय घ्यावा आणि या या जोडप्याला त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचण्यास मदत करावी.

Published by:Pooja Vichare

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#गलय #दन #महनयपसन #बगलदश #जडपयच #पलस #सटशनमधयच #मककम #पण #पलसचच #उचलतयत #रहणयखणयच #खरच #वच #सवसतर

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Home Remedies : बंद नाकामुळे हैराण आहे बाळ, या घरगुती उपयांनी काही मिनिटांत मिळेल आराम

​ह्युमिडिफायरह्युमिडिफायर बाळासाठी एक प्रमुख भूमिका बजावत असतं. कारण ते हवेत आर्द्रता वाढवतात, ज्यामुळे बाळाचे नाक कोरडे होण्यापासून रोखता येते. तुम्ही बाळाच्या खोलीत बिछान्याजवळ,...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...