Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या
पिंपरी-चिंचवड : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ओंकार बाणखेले असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात अज्ञातांनी गोळी घातली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. यात जखमी झालेल्या ओंकारचे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुपारी दीड ते दोनच्या सुमारासची ही घटना आहे. ओंकार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मंचर पोलीस तिघांचा शोध घेतायेत.

पुण्यातील आंबेगाव तालुका हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघात येणाऱ्या एकलारे गावात ही धक्कादायक घटना घडली. एकलारे गावाजवळ ओंकार आणि त्याचा मित्र दुचाकीवरून निघाले होते. प ण मागून काळ येत होता, याची त्याला पुसटशी कल्पना ही नव्हती. कारण मागून येणाऱ्या दुचाकीवरून आलेले तिघे त्याचा खात्मा करण्यासाठी त्याच्या दिशेने आले. त्यांनी गाडी आडवी घातली, त्यामुळे त्यांना गाडी थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. काही कळण्याआधी दोघे गाडीवरून उतरले, पैकी एकाने ओंकारच्या डोक्यावर बंदूक रोखली अन क्षणार्धात त्याने गोळीही झाडली. अगदी जवळून थेट डोक्यात गोळी झाडल्याने ओंकार वाचन कठीण होता अन अपेक्षेप्रमाणे उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

सुदैवाने ओंकारच्या साथीदाराला मात्र त्यांनी हात लावलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्याच्या डोळ्यादेखत हे सर्व घडल्याने तो त्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे पोलिसांना अपेक्षित जबाब अद्याप प्राप्त होऊ शकला नाही. पण ओंकार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असेल. असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्याअनुषंगाने मंचर पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहे.

गृहमंत्र्यांच्या आंबेगाव मतदार संघात गुन्हेगारी उफाळून आल्याचं यानिमित्ताने दिसून येतंय. याआधी 25 मे च्या रात्री दोघांच्या हत्या झाल्या होत्या. दोन स्वतंत्र घटनेत एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर जुलै महिन्यातच त्यांच्या लगतच्या खेड-आंबेगाव मतदारसंघात दुहेरी हत्याकांड घडलं होतं. विवाहबाह्य संबंधातून लोखंडी सळईने चटके देत, अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात एकामागोमाग एक घटना समोर येतायत. त्या रोखण्याचं गृह विभागासमोर मोठं आव्हान आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#गहमतर #दलप #वळस #पटल #यचय #मतदरसघत #भरदवस #एकच #गळय #झडन #हतय

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

‘शेरशाह’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण! कियाराने दिल्या हटके शुभेच्छा, म्हणाली ‘सिद्धार्थ तू तर…’

Sidharth Malhotra, Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या...

१० रुपयांचं नूडल्स चोरणाऱ्या लहान मुलांना अघोरी शिक्षा, वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

पाटणा: बिहारमध्ये १० रुपयांचे नुडल्स चोरणाऱ्या चार लहान मुलांना तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. बिहारच्या किशनगंजमध्ये ही घटना घडली आहे. येथे या चार...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...