Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर, जाणून घ्या किती आमदारसोबत?

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर, जाणून घ्या किती आमदारसोबत?


Maharashtra Political Crisis Eknath Shinde : शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाने दुपारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. 

एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत, शिवसेनेचे 35 आमदार दिसत असून 7  अपक्ष आमदार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी आणखी चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आणखी चार आमदार कोण आहेत, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आज, मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित आहेत.

मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. 

एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (22 जून) त्यांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्ध्या तासात शिवसेना भवनात बैठकीसाठी हजर राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना भवनात बोलवण्यात आलेली ही बैठक तातडीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#गवहटमधय #एकनथ #शदच #शकतपरदरशन #नव #वहडओ #समर #जणन #घय #कत #आमदरसबत

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Most Popular

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?

Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा थरारक Video समोर

औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे....

Jio Plans: रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन फ्री राहा , Jio चा सर्वात वार्षिक प्लान, पाहा डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

नवी दिल्ली: Reliance Jio Annual Plans:टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या यूजर्सना वेळोवेळी अनेक फायदे ऑफर करत असते . किफायतशीर किमतीत चांगले प्लान उपलब्ध...

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार?

मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर...