Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात


गुवाहाटी, 24 जून : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी गुवाहाटी येथे गेलेल्या एका शिवसेनेच्या नेत्याला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 37 आमदारांना पुन्हा मुंबईत येण्याची साद घातली जात आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि इतर अनेक नेत्यांनी तसे प्रयत्न केले. मात्र शिंदे गट आपल्या भूमिकवर ठाम आहे.

बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलजवळ शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले पोहोचले होते. त्यावेळी त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करत होते.

एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल

आज मी गुवाहाटीला पोहोचलो असून पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’वर परतण्याचे आवाहन केल्याचे संजय भोसले यांनी सांगितले. शिवसेनेने आपल्या आमदारांना खूप काही दिले आहे. संजय भोसल एक पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते. “शिवसेना जिंदाबाद. एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला. उद्धवजींना, आदित्यजींना साथ द्या”, असं त्यांनी पोस्टरवर लिहिलं होतं.

यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

आसाममध्ये महाराष्ट्राचे आमदार राहतात का हे माहित नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचं अजब वक्तव्य

आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी थेट सांगून टाकले. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Pravin Wakchoure

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#गवहटत #शवसन #नतयल #पलसन #घतल #तबयत

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Blue Sky: आकाशाचा रंग निळा का? जाणून घ्या नेमकं कारण

Scientists Find Why Sky is Blue: आपली नजर वर गेली तर आपल्या निळंभोर आकाश दिसतं. पण आपण कधी विचार केला आहे का? आकाशाचा...

तुमच्या चेहऱ्यावरील तेज ठेवा कायम, ट्राय करा हे तीन अनोखे फेशियल

मुंबई, 03 जुलै : निरोगी आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) मिळवणे प्रत्येक मुलीची इच्छा असते. विशेषत: जेव्हा काही दिवसांवर एखादा कार्यक्रम किंवा सोहळा...

 ‘फुटिरां’बद्दलच्या विवेचनाची अपेक्षा!

अ‍ॅड. गणेश सोवनी सेनेच्या ३९ बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचे अधिकृतपणे न कळवताच राज्यपालांनी मविआ सरकारला संख्या परीक्षेला सामोरे जाण्याचे आदेश दिले. आता या...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत मोठी चूक; निवासस्थानात अज्ञात व्यक्ती घुसली

CM Mamata Banerjee Security: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर येत आहे....

जसप्रीत बुमराहने एका षटकात 35 धावा केल्यानंतर अँडरसन म्हणाला, “स्टुअर्ट ब्रॉड…”

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

मुंबईकरांनो आज घराबाहेर जायचंय तर ही बातमी नक्की वाचा… मध्य आणि हार्बर मार्गावर ‘मेगाब्लॉक’

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) आज रविवारी (3 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा....