IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर एक फोटो शेअर केला आहे (IAS officer awanish sharan twitter post about Gutkha). ज्यात एका भिंतीवर गुटख्याबाबत मजकूर लिहिण्यात आला आहे. यात गुटखा खाणाऱ्याला पुरस्कार मिळणार असं नमूद करण्यात आलं आहे. 7 पुरस्कारांबाबत माहितीही देण्यात आली आहे. अवनीश शरण यांनी या फोटोला भारी कल्पना असं कॅप्शनही दिलं आहे.
आता एखादा आयएएस अधिकारी गुटखा खाणाऱ्यांना मिळणाऱ्या पुरस्काराचं कसं काय समर्थन करू शकतो, याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळे तुम्ही संतप्त होण्याआधी किंवा टीका करण्याआधी आयएएस अधिकाऱ्याने ज्याला भारी कल्पना म्हटलं आहे, ती कल्पना काय आहे, गुटख्याबाबत या पोस्टमध्ये काय म्हणण्यात आलं आहे, गुटखा खाणाऱ्याला नेमके कोणते 7 पुरस्कार मिळणार आणि का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही पोस्ट पाहिल्यानंतरच मिळेल.
हे वाचा – 11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण…; मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरची अवस्था पाहूनच हादराल
पोस्टमध्ये पाहू शकता एक फोटो आहे, ज्यात भिंतीवर गुटख्याचा उल्लेख करत काही मजकूर लिहिण्यात आला आहे. ज्यात 7 पुरस्कारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रथम पुरस्कार म्हणून कॅन्सरचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे एकेएक पुरस्कार सांगण्यात आला आहे. त्यानंतर सातवा आणि शेवटचा पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीचं राम नाम सत्य होतं पक्कं.
बढ़िया आइडिया. pic.twitter.com/VibFwg56nT
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 13, 2022
तसंच या फोटोत इथं याचा फॉर्म मिळेल आणि पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून यमराजचं नाव लिहिण्यात आलं आहे.
हे वाचा – बाबो! तब्बल 1 लाख 90 हजार रुपयाला Chips चा एक तुकडा; इतकं काय आहे त्यात खास पाहा
एकंदर आएएस अधिकाऱ्याची ही पोस्ट म्हणजे गुटख्याचं समर्थन करणारी किंवा गुटखा खाणाऱ्यांना पाठिंबा देणारी नव्हे तर गुटख्या खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात याबाबत जनजागृती करणारी आहे. तसं गुटखा, सिगारेट यांच्या पाकिटांवरही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं ठळक अक्षरात लिहिलेलं असतं. तरीसुद्धा लोक काही व्यसन सोडत नाहीत. त्यामुळे किमान अशा पद्धतीने जनजागृती केल्याने तरी अनेकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#गटख #ख #परसकर #मळव #IAS #अधकऱयच #पसट #सशल #मडयवर #चरचत