विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या फुटीर गटाला मान्यता देण्यात आली त्यामुळे शिवसेनेला धक्का मानला जात आहे. या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
‘पक्षाच्या विरोधात बाहेर कारवाया केल्या, राज्यसभेबाहेर काम केले म्हणून शरद यादव यांचं निलंबन केले. व्यंकय्या नायडू यांनी केली होता. महाराष्ट्रात हा निर्णय लावण्याचा प्रयत्न केला असता, तो लागू झाला नाही. एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा न्याय हे योग्य नाही. वेळेनुसार मालक बदलला की निर्णय बदलले जात आहे. संसदेच्या न्याय प्रक्रियेत वेगळे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
(गर्ल्स ट्रिप एन्जॉय करायचीय? ‘ही’ आहेत मुलींसाठी सुंदर-सुरक्षित पर्यटनस्थळं)
‘नरहरी झिरवळ यांनी निर्णय घेतला होता. तो नव्या अध्यक्षांनी बदलला. नवे अध्य़क्ष हे भाजप पक्षाचे आहे. झिरवळ यांनी काही वेगळा निर्णय घेतला नव्हता. तुम्ही फुटला आहात आणि तुमचा हा पक्ष कसा होऊ शकतो, हे तुम्ही मनाला विचारलं पाहिजे. अध्यक्षांनीही याबद्दल विचारले पाहिजे. आमची कायदेशीर लढाई आम्ही लढणारच आहोत. 11 जुलैला सुनावणी आहे. कोर्टात सुनावणी सुरू होती, तोपर्यंत अशी निवडणूक घेणे हे घटनाबाह्य आहे. ते पात्र आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, असंही राऊत म्हणाले.
‘शिवसेना ही काही युक्रेन नाही. असा कोणताही गट हे ताब्यात घेऊ शकत नाही. विधीमंडळात असं होऊ शकत नाही. ग्रामीण भागात शिवसेना तिच आहे. शिवसेना कमजोर झाली असं म्हणणे म्हणजे, बाळासाहेबांचा हा अपमान आहे. हे सहन करणार नाही. विधीमंडळात आमचे आमदार फुटले आहे. मुंबईतील धनसंपत्ती हाती घेण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली आहे. या बंडामागेच ही शक्ती आहे. या गटावर दबाव टाकण्यात आला आहे. त्यांच्या मानेवर बंदूक ठेवण्यात आली होती. कालपर्यंत हे वाघ होते, वाघांचे बछडे होते. एवढी सुरक्षा ही कसाबला सुद्धा नव्हती, असा टोलाही राऊतांनी लगावला.
(अजित पवार फडणवीसांच्या जागी बसणार; विरोधी पक्षनेते होणार? बैठकीत चर्चा)
2019 मध्ये आम्हीच मुख्यमंत्रिपद मागत होतो, त्यावेळी का नाही दिलं. त्यावेळी चर्चा करायलाही तयार होतो. पण यांना फोडून सत्ता मिळवायची होती, अशी टीकाही राऊत यांनी केली.
उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये भाजपचेच लोक होते. इतर सुद्धा घटनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सापडले आहे. दोन धर्मामध्ये दंगल घडवून निवडणूक जिंकायची आहे. असं जर होत असेल तर देशाचं राजकारण रक्तरंजीत होत आहे, असा आरोपही राऊतांनी केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#गजरतसबत #महरषटरत #नवडणक #हतल #सजय #रऊतच #दव