Friday, May 20, 2022
Home क्रीडा गुजरातचा अव्वल दोन संघांमधील स्थानाचा निर्धार; आज दुबळ्या चेन्नईशी सामना | Gujarat...

गुजरातचा अव्वल दोन संघांमधील स्थानाचा निर्धार; आज दुबळ्या चेन्नईशी सामना | Gujarat position top two teams Today match against weak Chennai ipl 2022 amy 95मुंबई : ‘आयपीएल’ची बाद फेरी सर्वप्रथम गाठणाऱ्या गुजरात टायटन्सनी रविवारी आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला नमवून गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमधील स्थानाचा निर्धार केला आहे.
हार्दिक पंडय़ाच्या कुशल नेतृत्वाखालील गुजरातने दोन सामने बाकी असतानाच बाद फेरीमधील स्थान पक्के केले आहे. गुजरातचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे रविवारी आणखी एका विजयासह अव्वल दोन संघांतील स्थान नक्की झाल्यास अंतिम फेरीची अतिरिक्त संधी मिळेल.
युवा सलामीवीर शुभमन गिल (३८४ धावा), कर्णधार हार्दिक (३४४ धावा), डेव्हिड मिलर (३३२ धावा), वृद्धिमान साहा (२१४ धावा) आणि राहुल तेवतिया (२१५ धावा) यांच्यावर गुजरातच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. तसेच मोहम्मद शमी (१६ बळी), लॉकी फग्र्युसन (१२ बळी) व रशिद खान (१५ बळी) हे जागतिक स्तरावरील गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.
चेन्नईसाठी यंदाचा हंगाम हा झगडणारा ठरला आहे. आतापर्यंत ४ विजय त्यांना मिळवता आले आहेत. रवींद्र जडेजाला नेतृत्व सोपवण्याचा महेंद्रसिंह धोनीचा निर्णय चुकीचा ठरला. त्यानंतर जडेजाकडून पुन्हा कर्णधारपद धोनीकडे आले. जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर चेन्नईशी त्याचे बिनसल्याच्या चर्चासुद्धा ऐरणीवर आहेत. चेन्नईच्या फलंदाजीची मदार ऋतुराज गायकवाड (३१३ धावा), शिवम दुबे (२८९ धावा), अंबाती रायुडू (२७१ धावा), डेव्हॉन कॉन्वे (२३१ धावा) आणि रॉबिन उथप्पा (२३० धावा) यांच्यावर आहे, तर गोलंदाजीची जबाबदारी ड्वेन ब्राव्हो (१६ बळी), मुकेश चौधरी (१६ बळी) आणि माहीश ठीकशाना (१२ बळी) यांच्यावर आहे.
’ वेळ : दुपारी ३.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १ (एचडी वाहिन्यांसह)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#गजरतच #अववल #दन #सघमधल #सथनच #नरधर #आज #दबळय #चननईश #समन #Gujarat #position #top #teams #Today #match #weak #Chennai #ipl #amy

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

Most Popular

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...