Saturday, July 2, 2022
Home क्रीडा "खेळता येत नसेल तर..."; विराटच्या फॉर्मवर दिग्गज कर्णधाराचे ठाम मत

“खेळता येत नसेल तर…”; विराटच्या फॉर्मवर दिग्गज कर्णधाराचे ठाम मत


नवी दिल्ली : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल माजी भारतीय कपिल देव यांनी मोठं भाष्य केलं आहे. कपिल म्हणाला की, माजी खेळाडू या नात्याने त्याला एखाद्या खेळाडूच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, जर ती कामगिरी त्याच्या स्तरावरची आणि स्थितीनुसार नसेल. कपिल अनेकदा उघडपणे कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल मत व्यक्त करतात. यावरून ते अनेकदा लोकांच्या निशाण्यावरही आली आहेत पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी धावा केल्या नाहीत किंवा त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी केली नाही तर इतरांना गप्प बसवणे सोपे नसते, असे या माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने ठामपणे सांगितले.

कपिल देव म्हणाले, “मी विराट कोहलीइतके क्रिकेट खेळलो नाही. कधी कधी तुम्ही फारसे क्रिकेट खेळले नसावे पण, तुम्ही गोष्टी शोधून काढू शकता. आम्ही क्रिकेटही खेळलो आणि खेळ समजून घेतला. त्यांचे विचार सुधारावे लागतील. तुम्ही आम्हाला तुमच्या खेळत चुकीचे सिद्ध केल्यास, आम्ही ते स्वीकारू. जर तुम्ही धावा केल्या नाहीत तर कुठेतरी काहीतरी चुकतंय असं आम्हाला वाटेल. आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते आणि ती म्हणजे तुमची कामगिरी आणि ती चांगली नसेल तर लोकांनी गप्प बसावे अशी अपेक्षा करू नका. तुमची बॅट आणि तुमची कामगिरी बोलली पाहिजे, आणखी काही नाही.”

वाचा – असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या

कोहलीचा खराब फॉर्म चिंताजनक
भारताचा माजी कर्णधार पुढे म्हणाले की, कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूने इतके दिवस शतक झळकावले नाही याचा विचार करणे दुखावते. कोहलीने शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते म्हणजेच त्याने शतक झळकावून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. कोहलीचा फॉर्म केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही चिंतेचा विषय असल्याचे कपिल यांना वाटते.

वाचा – खेळाडूच्या पत्नीने सांगितले सेक्स लाइफचे रहस्य, पाहा नेमकं काय म्हणाली…

‘कोहलीच्या खराब फॉर्ममुळे सर्वजण त्रस्त’
भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार पुढे म्हणाले की, “एवढा मोठा खेळाडू (कोहली) शतकाची वाट पाहत असल्याचे पाहून मला वाईट वाटते. तो आमच्यासाठी हिरोसारखा आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर किंवा वीरेंद्र सेहवाग यांच्याशी तुलना करता येईल असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण नंतर तो आला, आणि त्याने आम्हाला तुलना करायला भाग पाडले आणि आता गेल्या दोन वर्षांपासून तो धावा काढण्यासाठी झगडत आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना त्रास झाला आहे.”अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#खळत #यत #नसल #तर #वरटचय #फरमवर #दगगज #करणधरच #ठम #मत

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला लागला भुंगा, पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर

Tur dal : अन्न आणि पुरवठा विभागातील गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला आहे. जुलै 2021 मध्ये पूर...

ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सध्याच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये एक निडर फलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. एकदा का तो...

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Budget Plans: डेटा- कॉल ऑफर करणाऱ्या ‘या’ प्लान्सची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी, नंबर अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीही प्लान्स बेस्ट

नवी दिल्ली: Jio-Airtel-Vi Plans: आजकाल दूरसंचार कंपन्यांकडे एकापेक्षा जास्त प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. यात काही कंपन्यांचे प्लान्स खूप स्वस्त देखील आहेत. ज्यामध्ये डेटासह...

IND vs ENG, 5th Test : कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, दुसऱ्या दिवशी उशिराने मॅच सुरु होण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....