Saturday, August 13, 2022
Home क्रीडा खुब लढी मर्दानी; उपांत्य फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव, पण तरीही...

खुब लढी मर्दानी; उपांत्य फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाचा पराभव, पण तरीही कांस्यपदक मिळू शकतं…


टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करत धडाकेबाज सुरुवात केली होती. पण त्यानंतर अर्जेंटीनाने दोन गोल करत २-१ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि विजय साकारला. पण या पराभवानंतरही भारतीय संघाला कांस्यपदक पटकावण्याची संधी नक्कीच आहे.

भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत सामन्यात १-० अशी दमदार आघाडी घेतली होती. भारताची कर्णधार राणी रामपालने यावेळी पेनेल्टी कॉर्नर घेतला होता, त्यावर गुरजित कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातही भारताने अशीच सुरुवातीला आघाडी घेतली होती. भारताचा गोल झाल्यावर अर्जेंटीनाने भारतावर जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली होती. पण पहिल्या सत्रात भारताने त्यांची आक्रमणं थोपवून लावली होती आणि पहिल्या सत्रात भारताने १-० अशी आघाडी कायम ठेवली होती.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटीनाला गोल करण्यात यश मिळाले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला अर्जेंटीनाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर सामन्याच्या २१व्या मिनिटाला भारतााल गोल करण्याची एक संधी मिळाली होती. पण यावेळी भारताला या संधीचे सोने करता आले नाही. सामन्याचे २७वे मिनिट चांगलेच रंगतदार ठरले. कारण या एकाच मिनिटात पंचांनी तीन पेनेल्टी कॉर्नर दिले होते, यामध्ये भारताला दोन आणि अर्जेंटीनाला एक मिळाला होता. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी चांगली खेळ केला आणि सामन्याच्या मध्यंतरापर्यंत हा सामना १-१ अशा बरोबरीत होता. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या सत्राची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिसऱ्या सत्रात अर्जेंटीनाने अजून ३६ व्या मिनिटाला एक गोल केला आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या ४०व्या मिनिटाला भारताच्या नेहाला ग्रीन कार्ड मिळाले आणि ती सामन्यातून दोन मिनिटांसाठी बाहेर गेली.

उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये अर्जेंटीनाने चार सामने जिंकले आहेत तर त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे भारताने या ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत, तर त्यांना पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघ जेव्हा अर्जेंटीनाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांना एका सामन्यात विजय मिळता आला होता, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#खब #लढ #मरदन #उपतय #फरत #भरतचय #महल #हक #सघच #परभव #पण #तरह #कसयपदक #मळ #शकत

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

अनुष्काचा सिनेमा १५ वेळा पाहिला, डोक्यात एकच खूळ, शेवटी २० लीटर पेट्रोल अंगावर ओतून पेटवलं

बंगळुरु: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा अरुंधती हा चित्रपट पाहून एका २३ वर्षीय तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Sanjay Sirsath : शिंदेंनी शब्द दिला होता, मी मंत्रिमंडळात राहणार- शिरसाट

शिंदेंनी शब्द दिला,मी मंत्रिमंडळात राहणार, ठाकरे सरकारमध्येही यादीत नाव असताना वगळलं होतं, मंत्रिमंडळात मी असणार- संजय शिरसाट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Smartphone Sale: पहिल्याच सेलमध्ये अवघ्या ६७९९ रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ लेटेस्ट स्मार्टफोन, फोनमध्ये मजबूत बॅटरी

नवी दिल्ली: Infinix Smart 6 HD offers : Infinix ने अलीकडेच भारतात लाँच केलेला Infinix Smart 6 HD' कंपनीच्या स्मार्ट 6 स्मार्टफोन Series...