Saturday, July 2, 2022
Home करमणूक खास आहे पायल-संग्रामची लग्नपत्रिका; पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय INVITATION VIDEO

खास आहे पायल-संग्रामची लग्नपत्रिका; पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय INVITATION VIDEO


मुंबई, 23 जून-   ‘लॉकअप’ (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह  (Payal Rohtagi & Sangram Singh)   लवकरच लग्नगाठ बांधणार   (Wedding)  आहेत. सेलिब्रेटी कपल येत्या 9 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी दोघे गुजरात, राजस्थान किंवा हरियाणामध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नुकतंच संग्राम सिंह यांनी खुलासा करत आपण आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनतर आता दोघांची लग्नपत्रिका समोर आली आहे.

सध्या कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असतात. ते सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. दरम्यान नुकतंच पायल रोहतगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत आणि दोघांना लग्नाच्या शुभेच्छाही देत ​​आहेत. या लग्नपत्रिकामध्ये श्रीरामाचा उल्लेख करण्यात आला आहे. दोघांची ही लग्नपत्रिका अतिशय सुंदर आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान संग्राम सिंहने म्हटलं होतं, ‘असं म्हणतात की भाग्य त्याची भूमिका अचूकपणे पार पाडतं. पायलला मी पहिल्यांदा आग्रा मथुरा रोडवर भेटलो होतो. आणि आता आग्रा येथीलच जेपी पॅलेसमध्ये 9 जुलैला आमचं लग्न होणार आहे. मेहंदी, हळदी, संगीत हे सर्व कार्यक्रम 3 दिवस चालणार आहेत. आग्रा येथे अनेक मोठी जुनी सांस्कृतिक मंदिरे आहेत. मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. आग्रा या शहराला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. यानंतर आम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित करू, यासोबतच हरियाणातील लोकांना मिठाई आणि लाडू देखील पाठवण्यात येणार आहेत.
(हे वाचा:अभिनेत्रींना टक्कर देतेय दिग्दर्शक इम्तियाज अलींची लेक’; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट )
लग्नाच्या डेस्टिनेशनबाबत बोलताना पायल रोहतगीने म्हटलं होतं, ‘आग्रा हे ताजमहालसाठी ओळखलं जातं, परंतु आग्रामध्ये अशी अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. आग्रा येथील लोकांना हिंदू मंदिरांची माहिती व्हावी, म्हणून आम्ही त्याठिकाणी लग्न करत आहोत. मला माझं लग्न पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार करायचं आहे. आम्ही मुक्काम करत असलेल्या जेपी पॅलेसमध्ये सर्व मेहंदी, हळदी आणि संगीत विधी होणार आहेत. हा एक अतिशय खाजगी कार्यक्रम असेल, जिथे आमच्या जवळचे लोक उपस्थित असतील”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#खस #आह #पयलसगरमच #लगनपतरक #पनहपनह #पहल #जतय #INVITATION #VIDEO

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

शिंदेंच्या बंडखोर गटानं मुक्काम केलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं बिल किती? समोर आला आकडा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मुक्काम गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यूमध्ये होता. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार ८ दिवस गुवाहाटीत होते. या हॉटेलचं बिल...

कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, 32 IPS अधिकार्‍यांची बदल्या

Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय...

Face Blindness : ब्रॅड पिट आणि शहनाज ट्रेझरी ‘या’ आजाराने त्रस्त, भेटलेल्या लोकांचा विसरतात चेहरा, काय आहे हा असाध्य आजार?

शाहिद कपूर (Shahid Kapoor) सोबत 'इश्क विश्क' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेझरीवाला (Shenaz Treasury) असाध्य आजाराने त्रस्त आहे. शहनाजला...

Pune University Startup Fund: पुणे विद्यापीठ ‘स्टार्टअप्स’ला देणार निधी; असा करावा लागेल अर्ज

Pune University Startup Fund: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  (Pune University) 'SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन' ला स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत...

Mumbai Commissioner of Police : मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचा परिचय ABP Majha

<p>मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचा परिचय&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Mumbai...

विराट कोहली सुधारणार तरी कधी… पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध केली मोठी चूक, पाहा नेमकं काय घडलं

विराटट कोहली हा एकेकाळी धावांच्या राशी उभारायचा. पण सध्याच्या घडीला मात्र कोहली धावांचा दुष्काळ अनुभवत आहे आणि याचे कारण म्हणजे कोहलीकडून एक चूक...