Thursday, May 26, 2022
Home विश्व खारकीव्हमधून रशियाची माघार, सहा गावांवर युक्रेन लष्कराचा ताबा

खारकीव्हमधून रशियाची माघार, सहा गावांवर युक्रेन लष्कराचा ताबा


कीव्ह : सलग काही आठवडे जोरदार बॉम्बवर्षाव आणि संघर्षानंतर, रशियाच्या फौजा युक्रेनच्या खारकीव्ह शहरातून माघार घेत आहेत. रशियाकडून आता पुरवठ्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत असून, दन्त्येस्क प्रांताच्या पूर्वेमध्ये बॉम्बफेक आणि हवाई हल्ले करत युक्रेनच्या लष्कराला उद्ध्वस्त करण्याची व्यूहरचना आखली आहे.

खारकीव्ह हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसांमध्येच या शहरावर ताबा मिळवला होता. आता हे युद्ध नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे, असे सांगत युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी दीर्घकालीन युद्धाचे सुतोवाच केले. तर, रशियाला युक्रेनमधून हुसकावून लावण्यासाठी युक्रेनकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्, हे युद्ध किती काळ चालेल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लाजिमिर झिल्येन्स्की यांनी म्हटले आहे. तसेच, या युद्धाचा अंतिम निकाल युरोप आणि मित्रदेशांकडून कशी मदत होते, यावर अवलंबून असेल, असेही त्यांनी नमूद केले.
सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र
पूर्वेतील डोनबास प्रदेश ताब्यात घेण्याचा निर्णय रशियाने घेतला असला, तरीही ही मोहीम रशियाला कठीण जात असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गावासाठी त्यांच्या लष्कराला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. तर, काही दिवसांमध्ये युक्रेनच्या लष्कराने सहा गावे परत मिळवली आहेत, असा दावा झिल्येन्स्की यांनी केला आहे. रशियाला या युद्धामध्ये आतापर्यंत कोणताही व्यूहरचनात्मक विजय मिळवता आलेला नाही, असे पाश्चिमात्य अधिकाऱ्याने सांगितले आहे. खारकीव्हबरोबरच खेरसन शहरामध्येही युक्रेनच्या लष्कराने जोरदार प्रतिहल्ल्याला सुरुवात केली आहे. तसेच, रुबझेन या छोट्या शहरावरही आता युक्रेनच्या लष्कराने नियंत्रण मिळवले आहे.

तरंगता पूल उडवला

रशियाला पूर्व युक्रेनमधील कारवाईसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा एक तरंगता पूल उडवून देण्यात युक्रेनला यश आले. बिलोहोरव्हिका येथील सिव्हरस्की डोनेट्स नदीवर हा पूल होता. या हल्ल्यामध्ये रशियाच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. किमान ७३ रणगाडे आणि अन्य लष्करी वाहने नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, पूर्व युक्रेनमधील कारवाईच्या दृष्टीने या पुलाला सामरिक महत्त्व होते. ब्रिटनच्या गुप्तचर विभागानेही या कारवाईला दुजोरा दिला आहे. यामध्ये अनेक रशियन सैनिक वाहून गेले असण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
फिनलँडचा १० सेकंदात बंदोबस्त करु, रशियाची नाटोच्या मुद्द्यावरुन धमकी
रशियन सैनिकाविरुद्ध खटला

युक्रेनमध्ये या युद्धातील पहिल्या खटल्याला शुक्रवारी सुरुवात झाली. रशियाच्या एका सैनिकाला ताब्यात घेतले असून, ६२ वर्षीय नागरिकाची गोळ्या घालून हत्याचा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

युरोपकडून मदत

युद्ध दीर्घकाळ चालण्याचा अंदाज असल्यामुळे, युक्रेनने शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर, युक्रेनला शस्त्रखरेदीसाठी ५२ कोटी डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची योजना असल्याचे युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेनने या घोषणेचे स्वागत केले आहे.

‘ओबीसींनी आरक्षण मिळत नाही हे केंद्र सरकारचं पाप’; भुजबळांचे भाजपवर टीकास्त्रअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#खरकवहमधन #रशयच #मघर #सह #गववर #यकरन #लषकरच #तब

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

धक्कादायक! क्रिकेटर Shikhar Dhawan ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मुंबई : आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये...

Diet For Healthy Skin: त्वचेचा आणि संतुलित आहाराचा आहे जवळचा संबंध, नितळ त्वचेसाठी या टिप्स लक्षात ठेवा

सौंदर्य आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. पण, ही गोष्ट अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय...

Afghanistan Blast : काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, 16 जणांचा मृत्यू

<p>काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं. अफगाणिस्तानमधल्या या स्फोटांत 16 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि उत्तरेकडचं शहर मजार ए...

महिंदा राजपक्षेंच्या अडचणी वाढल्या, सीआयडीकडून तब्बल तीन तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

कोलंबो : श्रीलंकेत ९ मे रोजी शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या समर्थकांनी हल्ले केले होते. महिंदा...

करण जोहर एकटा देतोय मुलांना आई-वडिलांचे प्रेम, सिंगल फादरने ‘या’ ५ गोष्टी ठेवाव्यात लक्षात, नातं अजूनच खुलेल

मुलांसोबत आनंदी जीवन जगानेहमी वादात असणाऱ्या करणने त्याच्या दोन्ही मुलांनी आई वडीलांचे प्रेम देऊन नवा आदर्श घालतला आहे. करण त्याच्या मुलांसोबत नेहमीच फोटो...