Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घ्यावी

खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घ्यावी


मुंबई, 02 डिसेंबर : असे अनेक खाद्य पदार्थ आहेत ज्यात हिंग (Asafoetida) टाकल्याने त्यांची चव अनेक पटींनी वाढते. काही शारीरीक समस्या कमी करण्यासाठीही हिंग घरगुती उपाय म्हणून हिंग वापरला जातो. विशेषत: पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हिंगाचा चांगला उपयोग होतो.

हिंगाचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी काही बाबतीत हिंग हानीकारकही ठरू शकतो. हिंगाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होते. हिंगाच्या अतिसेवनाने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते (Asafoetida or Hing Side Effects) त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

अतिसार आणि गॅस

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. परंतु, हिंगाचे प्रमाण लक्षात घेतले नाही किंवा हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिसार, गॅस आणि पोटात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. यासोबतच ओठांवर सूज येणे, डोकेदुखी, रक्तदाबाची समस्याही समोर येऊ शकते.

गर्भधारणा आणि स्तनपान

हिंगचे जास्त प्रमाणात सेवन करणे गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. एवढेच नाही तर हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही प्रकरणांमध्ये गर्भपात होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात हिंग खाणे महागात पडू शकते. कारण स्तनपानाद्वारे हिंग बाळाच्या आहाराचा एक भाग बनू शकते, ज्यामुळे बाळाचे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.

हे वाचा – औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं

उच्च आणि कमी रक्तदाब

हिंगाच्या अतिसेवनामुळे उच्च आणि कमी रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते. वास्तविक हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे म्हणूनही ओळखले जाते. हे रक्त पातळ करण्याचेही काम करते. एवढेच नाही तर हिंगामध्ये कौमरिन नावाचे एक संयुग आढळते, जे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते.

हे वाचा – Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित
डोकेदुखी आणि चक्कर येणे
कधी कधी हिंगाच्या अतिसेवनाने डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास देखील होऊ शकतो. हिंगाचे हे दुष्परिणाम सामान्यतः काही तास टिकतात, परंतु काही असले तरी जास्त प्रमाणात हिंग खाण्यापूर्वी एकदा विचार करणे आवश्यक आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#खदय #पदरथमधय #हगच #अतवपर #ठरत #हनकरक #य #लकन #वशष #कळज #घयव

RELATED ARTICLES

युक्रेनवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत मोठी बातमी, Microsoftनं केला खुलासा

युक्रेन, 16 जानेवारी: युक्रेनवर (Ukraine) झालेला सायबर हल्ला (Cyber Attack) हा मालवेअरचाच (Malware) असल्याचा खुलासा मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) केला आहे. युक्रेनमधील जवळपास 70 सरकारी...

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर भावूक झाली पत्नी अनुष्का, म्हणाली…

नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक...

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

Most Popular

Omicron मधून बरं झाल्यानंतर शरीरात इम्युनिटी किती दिवस राहते?

दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये पसरतोय. या नवीन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग पूर्वीच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं...

Electric Vehicle वर सरकार किती इन्सेन्टिव देतं? थेट ग्राहकाला होता फायदा

नवी दिल्ली, 15 जानेवारी : इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर इन्सेन्टिव देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी...

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

१४ जानेवारी रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने गमावली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला विराट कोहलीने...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला….

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्याने हे पद सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून...

Ear: उगीचच कानात काड्या घालू नका, वारंवार कान स्वच्छ करणे यासाठी आहे घातक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : कानात मळ जमा होणे सामान्य बाब आहे. तसे पाहिल्यास आपल्या कानांच्या संरक्षणासाठी मळ उपयोगी असतो. त्यामुळे बाहेरील धुळीचे...