Thursday, July 7, 2022
Home भारत खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्रानं सरकारला सहकार्य करावं :...

खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्रानं सरकारला सहकार्य करावं : कृषीमंत्री


Narendra Singh Tomar on Fertilisers : कृषी क्षेत्रात होणारा खते आणि कीटकनाशक यांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्रानं सरकारला सहयोग द्यायला हवा असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)यांनी व्यक्त केलं. फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या 11 व्या कृषीरासायनिक परिषदेला संबोधित करताना नरेंद्र सिंह तोमर बोलत होते. आपला देश शेतीवर आधारित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान फार मोठं आहे असल्याचं तोमर यांनी यावेली सांगितलं.

10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभरण्याचं काम सुरु

आपल्या देशामध्ये आता फलोत्पादन क्षेत्राला देखील प्रोत्साहन द्यायला हवं, जेणेकरुन आपण सर्व दृष्टीनं आत्मनिर्भर होऊ शकू असेही तोमर यावेळी म्हणाले. आपला देश आता अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सुस्थितीत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीनं आपल्याला शेतीच्या बाबतीत अधिक विकसित राष्ट्रांकडे पाहून नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. त्यांच्यासोबतच पुढे जावं लागेल. देशात सध्या 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभारल्या जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ होत आहे. भविष्यातही त्या अधिक लाभदायक ठरतील. पिकांमध्ये वैविध्य आणण्याला देखील प्रोत्साहन दिलं गेले पाहिजे  असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.

कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावं 

कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत, फिक्कीसारख्या औद्योगिक संस्थांनी कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावं असे आवाहन देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं. केंद्रीय रसायने आणि खते तसेच नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कीटकनाशकांच्या वापराबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर जनजागृती चालू आहे. सध्या मोठ्या प्रमाणवर वाढत चालेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट  परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रासायनिक खतांचा अतिवापर धोकादायक आहे. त्यामुळं रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम या विषयाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#खत #आण #कटकनशकच #वपर #कम #करणयसठ #खसग #कषतरन #सरकरल #सहकरय #करव #कषमतर

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Most Popular

IND vs ENG : टीम इंडिया 11 दिवसात 6 मॅच खेळणार, रोहितचं कमबॅक, पाहा Schedule

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England T20 Series) 7 विकेटने दारूण पराभव झाला. यानंतर आता दोन्ही टीममध्ये...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...