Thursday, May 26, 2022
Home क्रीडा “कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BBCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जा मंत्र्यांची...

“कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BBCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जा मंत्र्यांची प्रतिक्रिया


मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे

विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावर बहुतांश क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माचेनेही याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाने रोहित शर्मालाही धक्का बसला आहे. मात्र निर्यणावरुन आता काँग्रेसने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे. क्रिकेट बोर्डातील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय अशा खोचक शब्दात काँग्रेस आमदाराने बीसीसीआयच्या कारभारावर टीका केली आहे.

राज्याचे उर्जा मंत्री आणि काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी विराट कोहलीच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर ही टीका केली आहे. “भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता,” असे नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका दिवसानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने अभिनंदन केले असून बोर्ड आणि निवड समिती त्यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विराट कोहलीबाबतही निवेदन दिले असून त्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि संयुक्त सचिव यांच्या नावाचा समावेश आहे.

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

एका प्रसिद्धीपत्रकात, बीसीसीआयने म्हटले आहे की, बोर्डाला विश्वास आहे की ते भारतीय क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यासाठी विराट खेळाडू म्हणून आपले सर्वोत्तम कार्य करत राहतील. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. एमएस धोनीनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकली होती. विराटने कसोटी संघाला पहिल्या क्रमांकावर नेले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कहल #जवह #रजनम #दत #तवह #समजव #क #BBCIमधल #शहजदयच #रजकरण #उरज #मतरयच #परतकरय

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

IPL नंतर घरी पोहोचताच शिखर धवनची जोरदार धुलाई, जाणून घ्या काय संपूर्ण प्रकरण

मुंबई : भारताचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्ले ऑफपूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धवनने त्याच्या घराचा एक व्हिडिओ...

मोबाइल अॅपमध्ये आता गुगल मॅपचे ऐतिहासिक स्ट्रीट व्यू फीचर , कंपनीने आणला नवा कॅमेरा  

Google Maps Update : जगातील सर्वात मोठी सर्ज इंजिन कंपनी गूगलने ( Google ) स्ट्रीट व्यू च्या वर्धापन...

Anil Parab : अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tassine Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु

<p>अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tasin Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

राहुल द्रविडऐवजी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच, BCCI ची घोषणा

मुंबई, 25 मे : बीसीसीआयने (BCCI) एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) टीम इंडियाच्या आयर्लंड (India vs Ireland) दौऱ्यासाठी मुख्य कोच म्हणून नियुक्ती...

Smart TV Offers: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! १८ हजारांचा टीव्ही फक्त ५०० रुपयात, पाहा शानदार ऑफर

नवी दिल्ली : Discount on KODAK Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरू आहे. २४ मे पासून...

जास्त वेळ झोपल्यानं वाढते वजन; आरोग्यावर होतो वाईट परिणाम

Health Care Tips : रोज सात ते आठ तास झोप होणे अत्यंत आवश्यक असते, असे काहींचे मत असते....