Thursday, May 26, 2022
Home क्रीडा कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर BCCI काय म्हणालं पाहा

कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर BCCI काय म्हणालं पाहा


मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयाचे बीसीसीआयने स्वागत केलं आहे. शिवाय हा निर्णय कोहलीचा असल्याचंही बीसीसीआयने म्हटलंय. 

दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, बोर्ड सचिव जय शाह यांनी शनिवारी विराट कोहलीबद्दल ट्विट केलं आणि कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

यानंतर आता बीसीसीआयकडून विराट कोहली आणि त्याच्या निर्णयासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटलंय की, “विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार म्हणून आणि कारकिर्दीबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन करतो. बीसीसीआय आणि निवड समिती विराट कोहलीच्या या निर्णयाचा आदर करतो.”

बीसीसीआयने त्यांच्या रिलीजमध्ये म्हटलं आहे की, “विराट कोहली भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरलाय. महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद केलं, त्यापैकी त्याने 40 सामने जिंकले. यादरम्यान विराट कोहलीची विजयाची टक्केवारी 58.82 टक्के होती. कर्णधार म्हणून विराट कोहलीने श्रीलंकेत पहिली मालिका जिंकली होती.”

बीसीसीआयने सांगितलं की, “विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका जिंकली, वेस्ट इंडिजचा पराभव केला, कसोटीत प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावलं आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराट कोहलीने घरच्या मैदानावर 31 सामन्यांचं नेतृत्व केलं यामध्ये 24 जिंकले आणि केवळ 2 सामने गमावलेत”

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने दिलेल्या योगदानाबद्दल मला आभार मानायचेत, असं विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलंय. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये यश मिळवलंय. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि बीसीसीआय त्याचा आदर करते. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो, असंही गांगुली म्हणालेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कहलन #करणधरपद #सडलयवर #BCCI #कय #महणल #पह

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

Smart Tv Offers: सॅमसंगची जबरदस्त डील, ‘या’ स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर फ्री मिळणार १.३२ लाखांचा स्मार्टफोन, पाहा ऑफर

नवी दिल्ली: Samsung Big TV Days Sale: नामांकित टेक कंपनी सॅमसंग आपल्या टीव्हीवर अतिशय आकर्षक ऑफर देत आहे . सॅमसंगच्या या ऑफर्स बिग...

प्रत्येक 100 रस्ते अपघातात 36 लोकांचा मृत्यू, तरुणांची संख्या सर्वाधिक – रिपोर्ट

नवी दिल्ली, 26 मे : 2020 मध्ये प्रत्येक 100 रस्ते अपघातात कमीत-कमी 36 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मागील 20 वर्षातील सर्वाधिक आकडा...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Anil Parab ED Raid : अनिल परब प्रकरणावर मविआ मंत्र्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया?

<p>अनिल परब प्रकरणावर मविआ मंत्र्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया? "अशा कारवाया महाराष्ट्रातच का होतात?", मंत्र्यांचा सवाल.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

रक्त आणि throat swab मध्ये सापडला Monkeypox virus, उपचारांवर लॅन्सेटचा रिसर्च

इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...