खरंतर, मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांशी ठिकाणी ऑनलाइन क्लासचा पर्याय अवलंबला आहे. असं असलं तरी देशातील अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्गात मिळालेल्या गुणांवर आधारित गुण देऊन पास केलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता लागली आहे. अशात एचएडीएफसी बँकेची नोकर भरतीची एक जाहिरात व्हायरल झाली.
हेही वाचा-Fake institutes: UGC नं जारी केली 24 बनावट इन्स्टिट्यूट्सची यादी; बघा यादी
संबंधित जाहिरात एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेनं काढली होती. ज्यामध्ये 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी अट ठेवण्यात आली होती. पण अवघ्या काही मिनिटांत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे अनेकांनी एचडीएफसी बँकेवर टीका केली आहे. यानंतर आता बँकेनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा-IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी भरती; असं करा अर्ज
झी न्युजने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेनं आपली चूक मान्य केली आहे. तसेच जाहिरात टाईप करत असताना, त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे. तसेच बँकेनं आता एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असंही त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल बँकेकडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कवड #बचचय #वदयरथयन #अरज #कर #नय #नकरच #जहरत #वहयरल #हतच #बकन #दल #सपषटकरण