Saturday, November 27, 2021
Home विश्व कोरोना लस घेतल्यानंतर आजारी पडला; आता सरकार देणार 1 कोटी 23 लाख...

कोरोना लस घेतल्यानंतर आजारी पडला; आता सरकार देणार 1 कोटी 23 लाख रुपये


सिंगापूर, 18 ऑगस्ट : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर ताप येणं, हात दुखणं, डोकं जड होणं अशा किरकोळ समस्या बहुतेकांना जाणवत आहेत. पण काहींना गंभीर समस्याही उद्भवत आहेत (Side effect of corona vaccine). कोरोना लसीकरणानंतर गंभीर समस्या उद्भवणाऱ्या अशा लोकांसाठी सिंगापूर (Singapore) सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत देऊ केली आहे.
सिंगापूरमध्ये 16 वर्षीय मुलाला कोरोना लस (Corona vaccination) घेतल्यानंतर हार्ट अटॅक (Heart attack) आला. त्याने फायझरची कोरोना लस (Pfizer Vaccine) घेतली होती. लसीकरणानंतर सहा दिवसांत त्याला हृदयविकाराचा झटका आला. पण यामुळे तो करोडपती बनेल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.
सिंगापूर सरकार आता या मुलाला आर्थिक मदत म्हणून 2 लाख 25 हजार सिंगापूर डॉलर्स म्हणजे जवळपास 1 कोटी 23 लाख रुपये देणार आहे. आरोग्य मंत्रायलाने पत्रकार ही घोषणा केली. सिंगापूर वॅक्सिन इंज्युरी फायन्साशिअल असिस्टेंस प्रोग्राम (VIFAP)  अंतर्गत ही मदत दिली जाणार आहे.
हे वाचा – धक्कादायक! चीनने खाण्यासाठी विकली कोरोना संक्रमित जनावरं; रिपोर्टमधून पोलखोल
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्या मायोकार्डिटिस (myocarditis) झाला ज्यामुळे त्याला हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं. कोरोना लशीमुळे ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कॅफिनेयुक्त पेयाचं सेवन किंवा जड वजन उचलल्याने ही समस्या अधिक तीव्र होते.
मायोकार्डिटीज  हे व्हायरस इन्फेक्शन आहे. यामुळे हृदय कमजोर होऊ शकतं आणि हार्ट येऊन मृत्यूचा धोकाही असतो. छातीत वेदना आणि श्वास घेताना त्रास ही याची सामान्य लक्षणं आहेत.
हे वाचा – कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
दरम्यान या मुलाची प्रकृती आता सुधारली आहे. तो आपली दैनंदिन काम करू शकतो, असंही मंत्रालयाने सांगितलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करन #लस #घतलयनतर #आजर #पडल #आत #सरकर #दणर #कट #लख #रपय

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...