सततच्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) व्यवसाय आणि व्यापारी दुकानं बंद असल्यानं अनेकांना आर्थिक अडचणींचा (Financial Crisis) सामना करावा लागत आहे. व्यवसाय ठप्प असल्यानं कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात अनेकांनी मित्रांकडून पैसे उसने घेत प्रपंच चालवण्याचा प्रयत्न केला. पण हे आणखी किती दिवस चालणार या विवंचनेमुळे नैराश्य आलेल्या डोंबिवलीतील (Dombivali) एका व्यापारी तरुणानं आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
हेही वाचा-एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या
सूरज सोनी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील दावडी गावातील रहिवासी होता. त्याचं डोंबिवली परिसरात मोबाईल विक्री-दुरुस्तीचा व्यवसाय होता. पण सततच्या लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला होता. कोरोना निर्बंध आणि टाळेबंदी यामुळे संसाराचा गाडा चालवणंही अवघड होऊन बसलं होतं. यामुळे आर्थिक विवंचनाही वाढत गेली होती. दरम्यान, नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या सूरज यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सोमवारी रात्री त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
हेही वाचा-कचऱ्यात बसवून सडलेलं अन्न खायला पाडलं भाग; क्रूरतेच्या परिसीमा गाठणारा VIDEO
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मृत सूरज सोनी याचं दुकान होतं. पण कोरोना निर्बंधांमुळे त्याला दुकान बंद ठेवावं लागलं. दरम्यान कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशात घराचं वीजबिल भरणं त्याला अशक्य होतं. दुसरीकडे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या घराचा वीजपुरवठा देखील खंडित केला होता. काही दिवस मित्रांकडून पैसे घेऊन घर चालवलं. पण हे किती दिवस असंच करायचं यातून नैराश्य आल्यानं सूरज यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#करन #नरबधमळ #आरथक #कबरड #मडल #डबवलत #तरण #वयपऱयन #मतयल #कवटळल