Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंधांत मोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंधांत मोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी<p style="text-align: justify;">मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे. केवळ लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच ‘ताजिया’ मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असेल, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र रस्त्यावरुन पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी असून, एका ट्रकवर केवळ 15 जणांनाच मुभा देण्यात आली आहे.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान या मिरवणुकीची परवानगी असून यासाठी दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंतची वेळमर्यादा राहील. तसेच या 105 पैकी मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी असेल, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईत येत्या शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी शिया मुस्लीम संघटनेला मोहरम निमित्तानं प्रतिकात्मक शोक मिरवणूक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. या ताजियात सामील होणाऱ्या प्रत्येकानं त्या विभागातील पोलीस उपायुक्तांकडे गुरूवारी दुपारीपर्यंत जमा करणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या निर्देशांत स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती के.के. तातेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं मंगळवारी हे निर्देश जारी केलेत.</p>
<p style="text-align: justify;">दक्षिण मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी करत ऑल इंडिया इदारा-ए-तहफुज-ए-हुसेनियात या संघटनेच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत मेहंदी, अल्लाम आणि ताजिया विधी करण्याची परवानगी मिळावी यासाठी या याचिकेतून मागणी केली होती. मात्र, हजारो शिया मुस्लीम वार्षिक मोहरमच्या मिरवणुकीत सहभाग घेतात आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याला परवानगी दिली जाऊ नये अशी भुमिका घेत राज्याच्यावतीनं मांडण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपले सण उत्सव आपापल्या घरात साधेपणानंच साजरे करावेत, असं राज्य सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सध्या कमी झाल्यानं राज्य सरकारनं अनलॉकचे निर्बंध अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका ध्यानात ठेवूनच प्रत्येक धर्मियांनी यंदाच्यावर्षी आपले सण उत्सव साजरे करावेत असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. तसेच हे निर्देश याचिकाकर्त्यांना केवळ मुंबईपुरताच दिलेले आहेत. ते राज्यात इतरत्र कुठेही लागू होणार नाहीत असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करनचय #परशवभमवर #मबईत #कडक #नरबधत #महरम #मरवणकल #हयकरटच #सरशत #परवनग

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...