Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग


मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे महत्त्व समजले आहे. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, या हँड सॅनिटायझरच्या मदतीने आपली अनेक कामे सोपी होऊ शकतात. गरज पडल्यास गडबडीच्या वेळात हँड सॅनिटायझरच्या मदतीने आपण चष्मा देखील स्वच्छ करू शकतो आणि आवश्यक असल्यास तुमचा मेकअप ठीक करण्यासाठी वापरू शकता. आपण इतर कोणत्या कामांसाठी हँड सॅनिटायझर वापरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.

मेकअप ब्रश स्वच्छ करा –

खराब मेकअप ब्रश वापरल्याने त्वचेवर अनेक प्रकारचे इन्फेक्शन किंवा पिंपल्स होऊ शकतात. तुमचा मेकअप ब्रश घाण झाला असेल आणि तुम्ही तो साबणाने धुवू शकत नसाल तर तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता.

मोबाईलची स्वच्छता –

मोबाईल कधीही ओल्या कपड्याने किंवा पाण्याने स्वच्छ करू नये. मोबाईलची स्क्रीन घाण झाली असेल आणि तुम्हाला पाहण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ती लगेच हँड सॅनिटायझरने पुसून टाकू शकता.

हे वाचा – पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार

लिपस्टिकचे डाग –

तुमच्या ड्रेसवर लिपस्टिकच्या खुणा असतील तर लगेच त्यावर हँड सॅनिटायझर स्प्रे करा आणि घासून स्वच्छ करा. यामुळे डाग लगेच हलके होतील.

स्टिकर काढा –

नवीन भांडी किंवा कशावरही स्टिकर असल्यास ते काढण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरा. यासाठी तुम्ही स्टिकरच्या भागावर थोडेसे सॅनिटायझर लावा आणि स्टिकर घासा, लगेच निघेल.

हे वाचा – Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम

काच स्वच्छ होते-

सॅनिटायझरच्या मदतीने तुम्ही काचेच्या खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करू शकता. याशिवाय तुम्ही याच्या मदतीने आरसाही स्वच्छ करू शकता.

परमनंट मार्कर मार्क्स –

व्हाइट बोर्ड किंवा कशावर कायम मार्करच्या खुना असल्यास तुम्ही सॅनिटायझर वापरून मार्करचे चिन्ह स्वच्छ करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#करनच #ससरग #टळणयसबतच #हड #सनटयझरच #इतकय #कमसठ #कर #समरट #उपयग

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Ukraine Russia War : युक्रेनमधील पॉवर प्लांटजवळ रशियाचा हल्ला, भारताचं संयम राखण्याचं आवाहन

Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प (...