Monday, July 4, 2022
Home करमणूक कोण होणार करोडपतीमध्ये खेळणार मनोज बाजपेयी, सयाजी शिंदेंची मिळणार साथ

कोण होणार करोडपतीमध्ये खेळणार मनोज बाजपेयी, सयाजी शिंदेंची मिळणार साथ


मुंबई- कोण होणार करोडपतीमध्ये दर शनिवारी कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. या पुढील भागात बॉलिवूडचे दोन हरहुन्नरी अभिनेते मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे कर्मवीर भागात येणार आहेत. दोघंही साताऱ्यातील सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेसाठी खेळणार आहेत.

सयाजी शिंदे हे मराठी, हिंदी, दाक्षिणात्य आणि नाट्यसृष्टीतलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. तर दुसरीकडे मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार अभियानयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत आणि ते अजूनही देत आहेत.


मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. त्यांनी शूल चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटा दरम्यानच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. याशिवाय मनोज बाजपेयी हे हरिवंशराय बच्चन यांचे चाहते आहेत. कोण होणार करोडपतीच्या सेटवर मनोज यांनी हरिवंशराय बच्चन यांची कविताही सादर केली.

मनोज बाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही सांगितलं आहे. पाहा, ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेष, १४ ऑगस्ट, रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कण #हणर #करडपतमधय #खळणर #मनज #बजपय #सयज #शदच #मळणर #सथ

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

खरंच गरम पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो? धोका वाढण्यापूर्वी जाणून घ्या सत्य

काही लोकांचा असा विश्वास आहे की गरम पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. चला तर मग जाणून घेऊया गरम पाण्याने कोलेस्ट्रॉल खरंच कमी...

धाडसी प्रयत्न | Effort Movies The story of a scientist Rocketry The Numbi Effect writing directing amy 95

रेश्मा राईकवारएखादा विषय, विचार एकाच वेळी सगळय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम नाही. हे लक्षात घेऊन इतिहासाच्या पानात हरवलेले आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवेत असे...

सिंगल यूज प्लास्टिकबाबत या चुका आपण दररोज करतोय; गंभीर आजारांचा धोका

नवी दिल्ली, 03 जुलै : केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारने हे पाऊल...

Ajit Pawar : विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावाची घोषणा शक्य, आमदारांचा एकमताने प्रस्ताव

मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची वर्णी लागण्याची शक्यता असून त्यांच्या नावाची उद्या सकाळी घोषणा करण्यात येण्याची शक्यता...

‘मेरी तो किस्मत ही खराब है’ म्हणत रितेश देशमुखनं शेअर केला VIDEO!

मुंबई, 3 जुलै :  प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनं (ritesh deshmukh)आपल्या अभिनयानं अनेकांना वेड लावलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये साकारलेल्या हटके भूमिकेमुळे चाहत्यांनी...

डार्क सर्कल्स आलेत? ट्राय करा हे घरगुती उपाय, झटपट होतील गायब

Dark Circle Home Remedies : अनेक वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर केल्यानं डार्क सर्कल्सची (Dark Circles) समस्या जाणवते. तसेच...