Saturday, July 2, 2022
Home करमणूक 'कोण होणार करोडपती'च्या प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी, विनोदाचे बादशाह अशोक सराफ देणार आठवणींना...

‘कोण होणार करोडपती’च्या प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी, विनोदाचे बादशाह अशोक सराफ देणार आठवणींना उजाळा | Renowned veteran actor Ashok Saraf will soon participate in the game Kon Honar Crorepati nrp 97ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर विनोदाचे बादशाह अशोक सराफ हे सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत. त्यांना या मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी निश्चित पर्वणी ठरणार आहे.

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत. त्यामुळेच त्यांची गणना ही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये केली जाते. सिनेसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरुन ठेवल्या आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होत असतात. त्यानुसार पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ हे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.

“मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते त्याऐवजी…”; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने केला खुलासा

अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’ असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. ‘ययाती’पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आताच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ते सिनेनाट्यसृष्टीतील अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.

रिक्षा चालक ते नगरविकास मंत्री, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास

मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्सेही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तसेच लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी ताज्या केल्या. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्साही त्यांनी सांगितला. अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कण #हणर #करडपतचय #परकषकसठ #अनख #परवण #वनदच #बदशह #अशक #सरफ #दणर #आठवणन #उजळ #Renowned #veteran #actor #Ashok #Saraf #participate #game #Kon #Honar #Crorepati #nrp

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

शिंदे सरकारमधील 5 जणांचा पुढील आठवड्यात शपथविधी, चंद्रकांतदादांना हवं महसूल खातं

मुंबई, 02 जुलै :  एकनाथ शिंदे (eknath shinde government) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाल सुरू झाली आहे. लवकरच पुढील आठवड्यात...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका

META : सोशल मीडिया साईट फेसबुकची मूळ कंपनी मेटानं (Meta) यावर्षी  10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद का बरखास्त झाली? ‘ही’ आहेत कारणं

Maharashtra State Wrestling association : भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद...