Saturday, July 2, 2022
Home विश्व कोण आहेत एकनाथ शिंदे?, जगभरातील लोक करतायेत सर्च

कोण आहेत एकनाथ शिंदे?, जगभरातील लोक करतायेत सर्च


मुंबई : Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारला थेट आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना जगभरातील लोक सर्च करु लागले आहेत. पाकिस्तान आणि सौदी या मुस्लीम देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेविषयी महिती सर्च केली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्चमध्ये मागे टाकले आहे. पाकिस्तानात सर्च ट्रेंडमध्ये शिंदे टॉपवर आहेत. 54 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी शिंदेंबद्दल माहिती विचारली आहे.

एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 50 आमदार आहेत. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.

एकनाथ शिंदे (58) यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला आणि त्यांचे बालपण गरिबीत गेले. तो 16 वर्षांचा असताना त्याने आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली. याशिवाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ दारूच्या कारखान्यात काम केले. असंही म्हटलं जातं की 1980 च्या दशकात त्यांच्यावर बाळ ठाकरेंचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना हा एकमेव पक्ष होता जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांपर्यंत जायचा. भाजपही या बाबतीत खूप मागे होता.

कोण आहेत एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला आणि ते सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे आणि त्यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत म्हटले जायचे. मातोश्री हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे.

1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.

2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत  

1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 

2014 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले

एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कण #आहत #एकनथ #शद #जगभरतल #लक #करतयत #सरच

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

बर्मिंगहम, 1 जुलै : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (Ind Vs Eng Test Match) कसोटीत ज्याप्रकारे बाद झाला त्यावरुन त्याच्यावर टीका केली...

दवबिंदू आरोग्यासाठी असतात फायदेशीर; अनेक त्रासांवर कसे उपयुक्त ठरतात वाचा

मुंबई, 01 जुलै : सकाळी सकाळी झाडे, फुले, पाने, हिरवे गवत यावर पडलेले दवबिंदू (Morning Dew) पाहून मन प्रफुल्लीत होते. असे म्हणतात की दवबिंदूंनी झाकलेल्या...

Amartya Sen on Nation Crisis: देशातील तणावपूर्वक घटनांवर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

कोलकाताः मला कोणत्या गोष्टीची भिती वाटते का?, असं जर कोणी मला विचारलं तर मी त्याला होय असंच उत्तर दिलं. माझ्या भीतीचं कारण ही...

Manipur Landslide : मणिपूरमध्ये भूस्खलन, टेरिटोरियल आर्मीचे 25 जवान बेपत्ता ABP Majha

<p>&nbsp; मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेलाईचं काम सुरू असताना डोंगराचा एक मोठा भाग कोसळून भूस्खलन झालं... यात रेल्वेलाईनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले टेरिटोरियल आर्मीचे २५...

Rahul Narvekar: राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार ABP Majha

<p>राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Rahul...

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची ‘स्टँँड फॉर सेफ्टी’ मोहीम

सध्याच्या डीजीटल काळात आणि युगात , डीजीटल अ‍ॅप्सचा उदय झाला असून त्याची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळेच अर्थपूर्ण ऑनलाईन संपर्क...