Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., 'वर्षा'ते 'मातोश्री' दरम्यान शिवसैनिकांची...

कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, ‘वर्षा’ते ‘मातोश्री’ दरम्यान शिवसैनिकांची घोषणाबाजी


मुंबई : तुम्ही समोर येऊन सांगितला तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं बंडखोर आमदारांना सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच आपण वर्षा निवासस्थान सोडत असून ‘मातोश्री’वर जाणार असल्याचं जाहीर केलं. हे ऐकताच ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, आवाज कुणाच… शिवसेनेचा या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. 

उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं आणि ‘मातोश्री’कडे निघाले. उद्धव ठाकरे ‘वर्षा’मधून बाहेर आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे हे वर्षावरून बाहेर येताना लोकांनी एकच गर्दी केली. लोकांनी एवढी गर्दी केली होती की उद्धव ठाकरेंना त्यांच्या गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं. त्यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. यावेळी लोकांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शिवसैनिकांनी दिला. 

 

आवाज कुणाचा…शिवसेनेचा, उद्धव साहेब तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है…. अशा घोषणा देण्यात आल्या. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला या घोषणेने हा परिसर दुमदुमला. यावेळी शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. 

 

मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणाहून जात असतो तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने क्लिअर केला जातो. पण या रस्त्यावर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे वर्षा ते मातोश्री हे अंतर गाठायला मुख्यमंत्र्यांना तब्बल सव्वा तास लागला. या दरम्यान तीन वेळा मुख्यमंत्री गाडीतून बाहेर उतरले आणि त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच आदित्य ठाकरे यांनीही एका ठिकाणी गाडीच्या टफावर जाऊन लोकांना अभिवादन केलं. 

उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय. तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना म्हटलं होतं.

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कण #आल #र #कण #आल #शवसनच #वघ #आल #वरषत #मतशर #दरमयन #शवसनकच #घषणबज

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Micro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड करा, पाहा डिटेल्स

Tips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही...

Samsung ची भन्नाट ऑफर! ‘या’ यूजर्सला लॅपटॉप, स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन अथवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने Student Advantage Program...

Pune Water Issue : पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा ABP Majha

<p>पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेचा निर्णय. यापूर्वीच प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर.</p> <p>&nbsp;</p> अस्वीकरण:...

तुम्ही वातावरण बिघडवले, माफी मागा!; सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले

Supreme Court Nupur Sharma News : भाजपकडून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात फटकारले आहे. यासह न्यायालयाने शर्मा...

Political Crisis: बंडखोर आमदारांच्या ‘सोशल पोस्टव’रून उद्धव ठाकरे गायब; मात्र दिघेंचा…

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या 'सोशल पोस्टव'रून उद्धव ठाकरे गायब; मात्र दिघेंचा... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; शिवसेनेची ती याचिका फेटाळली

मुंबई 01 जुलै : सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्या म्हणजेच शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला...